होमपेज › Vidarbha › मुख्यमंत्र्यांवर आता विश्वास  राहिला नाही : आशिष देशमुख

मुख्यमंत्र्यांवर आता विश्वास  राहिला नाही : आशिष देशमुख

Published On: Feb 03 2018 2:43AM | Last Updated: Feb 03 2018 2:33AMनागपूर ः प्रतिनिधी

सत्तेवर येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस ज्या प्रश्नांवर बोलत होते, त्याकडे आज त्यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. रोजगार, उद्योग आणि कृषीचे प्रश्न आहेत तसेच आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर आता विश्वास राहिला नसून देवावर विश्वास आहे. त्यामुळेच विदर्भातील श्रद्धास्थानांना भेटी देत आहे, अशा शब्दांत भाजपचे नाराज आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी सरकारला घरचा आहेर दिला. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी काढलेली विदर्भ आत्मबळ यात्रा चंद्रपुरात आली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. विदर्भातील लोकांमध्ये जशी खदखद आहे, तशीच खदखद लोकप्रतिनिधींमध्येही आहे. ही खदखद वाढत चालली असून, ती मोठ्या प्रमाणात लवकरच बाहेर पडेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.