Mon, Apr 22, 2019 04:22होमपेज › Vidarbha › ‘विरोधीपक्षनेतेपद गेले तरी बेहत्तर, नितेश राणेवर कारवाई करणार’

नितेश राणे, कोळंबकर यांनी गद्दारी केली: विखे - पाटील 

Published On: Dec 15 2017 12:13PM | Last Updated: Dec 15 2017 12:21PM

बुकमार्क करा

नागपूर : दिलीप सपाटे

आमदार नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर यांनी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत पक्षाशी गद्दारी केली हे स्पष्ट आहे. माझे विरोधीपक्षनेतेपद गेले तरी बेहत्तर पण, या दोघांवर कारवाई केली जाईल, असे विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे - पाटील यांनी सांगितले. 

हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या पत्रकारांशी ते सुयोग निवासस्थानी बोलत होते. नुकत्याच झालेल्या विधानपरिषद पोटनिवडणुकीत नितेश राणे व कालिदास कोळंबकर यांनी भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या दोघांनीही प्रसिध्दी माध्यमांना तशी माहिती दिली होती. नितेश राणे यांनी तर काँग्रेसने कारवाई करून दाखवावी, असे आव्हान दिले होते. 

विधानभेत काँग्रेसचे 42 तर राष्ट्रवादीचे 41 सदस्य आहेत. या दोघांवर कारवाई केली तर काँग्रेसचे संख्याबळ राष्ट्रवादीपेक्षा कमी होणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडे असलेले विरोधीपक्षनेतेपद जाऊ शकते. परंतु, विखे - पाटील म्हणाले, या दोघांनी पक्षाशी गद्दारी केल्याचे स्पष्ट आहे. या प्रकरणी पक्षाचे निवडणूक प्रतिनिधी आमदार शरद रणपिसे यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. या दोघांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रीयांच्या क्लीपही गोळा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोघांवर पक्ष निश्चितपणे कारवाई करेल. कारवाई करताना माझ्झे विरोधीपक्षनेतेपद गेले तरी पक्षहितासाठी त्याचा विचार केला जाणार नाही.