Wed, Jul 17, 2019 15:58होमपेज › Vidarbha › एकाच वाहनाचा दोन ठिकाणी अपघात; मृतांची संख्या चार

एकाच वाहनाचा दोन ठिकाणी अपघात; मृतांची संख्या चार

Published On: Feb 27 2018 7:44PM | Last Updated: Feb 27 2018 7:43PMनागपूर : प्रतिनिधी

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरनजीकच्या चिंचपूर फाट्यानजीक ऑटो रिक्षाला कापूस घेऊन जाणार्‍या महिंद्रा पिकअप या वाहनाने धडक दिली. या अपघातात 3 जण ठार झाले. त्यानंतर महिंद्रा पिकअप तेथून फरार झाली. परंतु, तीच महिंद्रा पिकअप पुढे मलकापूर येथील गोडे कॉलेजचे स्नेहसंमेलन आटोपून घरी जात असलेल्या विद्यार्थ्यांवर उलटली.

यावेळी पिकअपखाली 4 विद्यार्थी दबले गेले. अपघातात 1 जण ठार झाला, तर 3 जण जखमी झाले. जखमींना मलकापूर जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे.  वाहनाचा चालक फरार झाला आहे.