बुलडाण्यात नवे ६ कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated: Jun 03 2020 6:28PM
Responsive image


बुलडाणा : पुढारी वृत्तसेवा 

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 39 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 33 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये 1 महिला व 5 पुरूष आहेत. सदर अहवालामध्ये मलकापूर येथील 25 वर्षीय तरूण, साखरखेर्डा (ता. सिंदखेड राजा) येथील 62 वर्षीय महिला तसेच 44 व 26 वर्षीय पुरूषासोबतच खामगांव येथील 18 आणि 36 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे आज चार रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये खामगांव व बुलडाणा येथील कोविड केअर सेंटरमधून प्रत्येकी दोन रूग्णांचा समावेश आहे. खामगांव येथील सुट्टी झालेले रूग्ण चांदुर बिस्वा ता. नांदुरा येथील 12 व 16 वर्षीय मुली आहेत. तसेच बुलडाणा येथून सुट्टी झालेल्यांमध्ये चिखली येथील महिला व निमखेड येथील पुरूष आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 75 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत झाले आहेत. आतापर्यंत 47 कोरोनाबधीत रूग्‍ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रूग्णालयात 25 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज रोजी अहवालाच्या प्रतीक्षेत असलेले नमुने 81 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.