Sat, Mar 23, 2019 02:16होमपेज › Vidarbha › जलाशयात सापडला 52 किलोंचा सिल्व्हर मासा

जलाशयात सापडला 52 किलोंचा सिल्व्हर मासा

Published On: Jan 03 2018 12:07PM | Last Updated: Jan 03 2018 12:07PM

बुकमार्क करा
नागपूर : प्रतिनिधी

विदर्भातले दुसर्‍या क्रमांकाचे जलाशय म्हणून ओळख असलेल्या व माशांसाठी प्रसिद्ध असलेल्या अप्पर वर्धा धरणात मासेमारी करणार्‍यांना तब्बल 52 किलोंचा सिल्व्हर मासा सापडला.इतक्या वजनाचा मासा साधारणपणे समुद्रातच सापडतो. अप्पर वर्धा धरणावर मासेारी करण्याचे कंत्राट राजुराबाजार येथील नळदमयंती सागर मत्स्य उत्पादक व मच्छीमार सहकारी संस्थेला मिळाले आहे. येथील मासे गोड्या पाण्यातले असल्यामुळे ते महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मागणीसुद्धा भरपूर आहे.पालांदूरचे यशवंत मेश्राम, गोपी कांबळे, गुलाब मेश्राम, सुरेश मेश्राम आदी कर्मचारी मासेारी करीत होते. हे मच्छीमार गोंदिया जिल्ह्यातल्या इटियाडोह धरणावरही मासेारी करतात. जाळे टाकून मासे पकडण्याचे त्यांचे काम सुरू असताना त्यांना जाळे नेहमीपेक्षा फार जड वाटले. जाळ्यात काही अडकले असेल, असे त्यांना सुरुवातीला वाटले. पण, पूर्ण ताकदीने जाळे वर काढल्यावर त्यांना त्यात भला मोठा मासा दिसला. जाळे वर काढून त्यांनी या माशाला त्यातच गुंडाळले व होडीत ठेवले. माशाचे वजन 52 किलो भरले. हा मासा सिल्व्हर नावाने ओळखले जातो.