Sun, May 19, 2019 22:00होमपेज › Vidarbha › शरद पवार यांचे ३७ वर्षांनी नागपुरात आंदोलन 

शरद पवार यांचे ३७ वर्षांनी नागपुरात आंदोलन 

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 11 2017 12:47AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या विरोधात शरद पवार यांनी 1980 मध्ये ऐतिहासिक मोर्चा काढला होता. येत्या 12 डिसेंबरला शरद पवार यांच्या नेतृत्वात निघणार्‍या मोर्चाने इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षातर्फे येत्या मंगळवारी निघणार्‍या हल्लाबोल मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार नागपुरात करणार आहेत. 

राज्य सरकारच्या विरोधात सर्व विरोधी पक्षातर्फे मोर्चा काढला जाणार आहे. राष्ट्रवादीकाँग्रेसने यापूर्वी 1 डिसेंबरपासून हल्लाबोल पदयात्रा यवतमाळहून सुरू केली होती. ही पदयात्रा नागपूर जिल्ह्यात दाखल झाली आहे. फडणवीस सरकारच्या विरोधात या मोर्चात विरोधकांची शक्ती दिसणार आहे. शरद पवार यांचा 12 डिसेंबरला वाढदिवसही आहे. त्यामुळे वाढदिवसाला ते शेतकर्‍यांच्या प्रश्नावर नागपुरात आंदोलन करणार आहेत. 

शरद पवारांनी विरोधी पक्षात असताना राज्य सरकारच्या विरोधात नागपुरात आंदोलन करण्याची ही 37 वर्षातील दुसरी घटना आहे. यापूर्वी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले सरकारच्या विरोधात 1980 मध्ये डिसेंबर महिन्यात बैलबंडी मोर्चा काढला होता. तेव्हा शरद पवार यांनी पुलोदचे नेतृत्व केले होते. त्यावेळीही शरद पवार यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नावरच मोर्चा काढला होता. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांनी सहभाग घेतला होता.