Tue, Jul 07, 2020 04:16होमपेज › Vidarbha › अकोल्यात तब्बल ३६ नवे पॉझिटिव्ह

अकोल्यात तब्बल ३६ नवे पॉझिटिव्ह

Last Updated: Jun 03 2020 11:46AM

संग्रहित छायाचित्रनागपुर : पुढारी वृत्तसेवा

विदर्भातील अकोला जिल्ह्यातील कोरोना वाढीचा वेग दिवसेंदिवस सुरुच आहे. मागील दीड ते दोन महिन्याच्या कालावधीत कोरोना विषाणूचा संसर्ग अकोल्यात झपाट्याने वाढला असून कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता ६६३ एवढी झाली आहे.

येथे अवघ्या ६० दिवसात रूग्ण संख्या सहाशेच्या पार पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासन हादरले आहे. अकोल्यात बुधवारी सकाळी कोरोना संसर्ग तपासणीचे १११ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ७५ अहवाल निगेटिव्ह तर ३६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या ६६३ झाली आहे.  यापैकी ३४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. ४६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजअखेर प्रत्यक्षात १६७ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुत्रांनी दिली आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी प्राप्त ३६ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १४ महिला व २२ पुरुष असे रुग्ण आहेत. त्यातील ११ जण अकोट फैल येथील, पाच जण देशमुख फैल येथील, कैलास टेकडी येथील तीन, खदान येथील तीन, न्यू तार फैल येथील तीन तर पाककरपुरा अकोट, अनिकर, वालोदे ले आउट हिंगणघाट रोड, ध्रुव अपार्टमेंट जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर, हिंद चौक, मोठी उमरी, रामदास पेठ, गुलजार पुरा, तार फैल, हरिहर पेठ, आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक जण आहेत.