Mon, Jul 22, 2019 00:36होमपेज › Vidarbha › नागपूरातील ३०४ शाळांकडे खेळाचे मैदानच नाही

नागपूरातील ३०४ शाळांकडे खेळाचे मैदानच नाही

Published On: Aug 30 2018 10:03PM | Last Updated: Aug 30 2018 8:34PMनागपूर : प्रतिनिधी 

नागपूर शहरातील तब्बल ३०४ शाळांमध्ये शाळेचे स्वत:चे खेळाचे मैदान नाही, अशी धक्कादायक माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रातून पुढे आली. यासंदर्भात शाळांच्या नावांसह नेमकी माहिती चार आठवड्यात सादर करण्याचे आदेश आज, गुरूवार (दि. ३० ऑगस्ट) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.

या प्रकरणात न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दखल करून घेतली. क्रीडांगणे नसताना शाळा विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचे धडे कसे देतात. शाळांनी याकरिता काही पर्यायी व्यवस्था केली आहे काय, याबात न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले होते. या प्रकरणात अ‍ॅड. अनिरुद्ध अनंतकृष्णन न्यायालयमित्र आहेत. 

माध्यमिक शाळा संहिता व अन्य कायदेशीर तरतुदी नुसार विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण देणे अनिवार्य आहे. शारीरिक शिक्षण क्रीडांगणाशिवाय दिले जाऊ नाही. त्यामुळे शाळांनी तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद अ‍ॅड. अनंतकृष्णन यांनी केला होता. आज जिल्हा परिषदेला माध्यमिक शिक्षण विभागाने सादर केलेल्या शपथपत्रात जिल्हा परिषदेच्या १०९ शाळांकडेच स्त:चे क्रीडांगण नसल्याचे स्पष्ट होत आहे. यासोबत नगरपरिषदेच्या सहा, महानगरपालिकेच्या २७, खासगी अनुदानित ६० आणि खासगी विनाअनुदानित ६५ शाळांचा समावेश आहे. पाच खासगी अनुदानित शाळांनी आता क्रीडांगण उपलब्ध करून दिले आहे असेही यात नमूद आहे.