Wed, Jul 17, 2019 20:33होमपेज › Vidarbha › राज्यात सतरा वर्षांत २६ हजारांवर शेतकर्‍यांच्या आत्महत्या

राज्यात सतरा वर्षांत २६ हजारांवर शेतकर्‍यांच्या आत्महत्या

Published On: Dec 16 2017 1:50AM | Last Updated: Dec 16 2017 1:50AM

बुकमार्क करा

नागपूर : वृत्तसंस्था

महाराष्ट्रात जानेवारी 2001 पासून ऑक्टोबर 2017 या 17 वर्षांच्या कालावधीत 26 हजार 339 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. यापैकी 12 हजार 805 शेतकर्‍यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती राज्य सरकारने अधिवेशनादरम्यान आज विधानसभेत दिली.

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, या वर्षी 1 जानेवारी ते 15 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यातील 580 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये एकट्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक 115 शेतकर्‍यांचा समावेश आहे.