Tue, Jul 23, 2019 00:29होमपेज › Sports › छातीत दुखू लागल्याने ब्रायन लारा मुंबईतील रुग्णालयात दाखल

छातीत दुखू लागल्याने ब्रायन लारा मुंबईतील रुग्णालयात दाखल

Published On: Jun 25 2019 2:58PM | Last Updated: Jun 25 2019 2:56PM
मुंबई : पुढारी ऑनलाइन

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याला छातीत दुखू लागल्याने मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने ब्रायन लारा मुंबईत आला आहे. मंगळवारी त्याच्या छातीत अचानक दुखू लागले त्यामुळे त्याला दुपारी एक वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

ब्रायन लाराला आपल्या शैलीदार डावखुऱ्या फलंदाजीसाठी ओळखले जाते. आता तो ५० वर्षांचा असून क्रिकेटमध्ये आता फारसा सक्रीय नाही. लाराने नव्वदच्या दशकात आपल्या फलंदाजीने जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला होता. लाराला बाद करणे भल्या भल्या गोलंदाजांसाठी आव्हानात्मक असायचे.

क्रिकेट करिअरमध्ये लाराने १३१ कसोटीत ११ हजार ९५३ धावा केल्या आहेत. यातील नाबाद ४०० धावांची त्याची सर्वोत्तम खेळी आहे. एकदिवसीयमध्ये त्याने २९९ सामन्यांत एक हजार ४०५ धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये ३४ शतके ४८ अर्धशतके तर एकदिवसीयमध्ये १९ शतके आणि ६३ अर्धशतके लाराच्या नावावर आहेत.