Sun, Dec 15, 2019 05:18होमपेज › Sports › वेस्ट इंडिजला मोठा धक्का; रसेल वर्ल्डकपमधून बाहेर 

वेस्ट इंडिजला मोठा धक्का; रसेल वर्ल्डकपमधून बाहेर 

Published On: Jun 24 2019 8:53PM | Last Updated: Jun 24 2019 9:00PM
लंडन : पुढारी ऑनलाईन 

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने अवघ्या ५ धावांनी सामना गमावला. कार्लोस ब्रेथवेटने एकहाती सामना खेचून आणला; पण शेवटी मोक्याच्या क्षणी तो बाद झाला त्यामुळे विंडीज पराभूत झाले. या पराभवानंतर वेस्ट इंडिजच्या सेमी फायनलमध्ये जाण्याची आशा मावळली आहे. त्यातच आता विंडीजला मोठा धक्का बसला आहे. विंडीजचा स्टार ऑल राऊंडर आंद्रे रसेल वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याला वेस्ट इंडिजच्या राहिलेल्या सामन्यांना मुकावे लागणार आहे. 

आयपीएलमध्ये आंद्रे रसेलने धावांचा पाऊस पाडला होता. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये तो धुमाकूळ घालणार असे वाटत होते. पण, स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीने उचल खाल्ली. तरीही तो सामने खेळत राहिला पण, दुखापत बळावल्याने त्याला उरलेल्या सामन्यात खेळता येणार नाही. त्याच्या जागी सुनिल अमरिस संघात आला आहे. आयसीसीच्या तांत्रिक समितीने आंद्रे रसेलच्या जागी सुनिल अमरिसला बदली खेळाडू म्हणून संघात सामिल करण्यास परवानगी दिली आहे. 

Andre Russell has been ruled out of further participation in the event due to an injury to his left knee. https://t.co/qTVlng5QAd

— ANI (@ANI) June 24, 2019

वेस्ट इंडिजने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांना फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे तर चार सामन्यात पराभव आणि एक सामना वॉश आऊट झाला आहे. त्यामुळे ते ३ गुणांसह पॉईंट टेबलमध्ये ८ व्या क्रमांकावर आहेत. त्यांचा पुढचा सामना २७ जूनला भारताबरोबर मँचेस्टरला होणार आहे.