'रन' मशीन 'विराट'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

Last Updated: Nov 05 2019 2:42PM
Responsive image

अक्षय कांबळे


 
स्वत:च्या फलंदाजीच्या वेगळ्या शैलीने सार्‍या जगाला भुरळ पाडून  वेड लावलेल्या किंग कोहलीने आज ३१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. एकदिवसीय, कसोटी तसेच टी-२० प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्व विक्रम आपल्याच नावावर करण्याचा त्याने जणू विडा उचलला आहे. त्याच्या या विक्रमांमुळे क्रिकेट जगतामध्ये तसेच त्याच्या चाहत्यांमध्ये त्याला 'रन' मशीन म्हणून ओळखले जाते. 

सर्वात जलद २० हजार आंतरराष्ट्रीय धावा, कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक द्विशतक तसेच आयसीसीचा पहिल्यांदाच दिला गेलेला क्लीन स्वीप पुरस्‍कार असे अनेक पुरस्कार त्याने स्वतःच्या नावावर केले आहेत. सध्या जगातील महान फलंदाजांमध्ये विराटचे नाव घेतले जाते. आयसीसी  रॅंकिंगमध्ये विराट एकदिवसीय प्रकारामध्ये नंबर एक तर कसोटी प्रकारामध्ये नंबर दोनला आहे.

 किंग कोहलीच्या फिटनेसची चर्चा तर कायमच त्याच्या चाहत्यांमध्ये सुरू असते. मास्टर ब्लास्टर सचिनचा १०० शतकांचा विश्वविक्रम मोडण्‍याकडे विराट वेगाने आगेकूच करत आहे. सचिनचा हा विक्रम विराटच मोडेल हा विश्वास चाहत्यांसह सचिनलाही आहे. सध्या कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६८ शतके आपल्या नावावर केली असून यामध्ये ४३ एकदिवसीय तर  २५ कसोटी शतकांचा समावेश आहे.

कोहलीने २००८ च्या अंडर १९ च्या टीमची धुरा संभाळत अंडर १९ विश्वकप भारतासाठी जिंकून आणला होता, तर पुढच्याचवर्षी २००९ च्या विश्वकपमध्ये त्याने महत्‍त्‍वाची कामगिरी बजावत इमर्जिंग प्लेयर म्हणून समोर आला.

विराट खेळीप्रमाणे लव्‍हलाईफमुळेही नेहमी चर्चेत

नेहमीच आपल्या विक्रमांमुळे चर्चेत असणारा कोहली लग्नापूर्वी  त्याच्या लव्हलाईफ म्‍हणजेच अनुष्‍कामुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत होता. तर लग्‍नानंतरही तो तितकाच चर्चेत असतो. यावेळी मात्र वाढदिवसाच्या आठवड्यात तो पत्नी अनुष्कासोबत माऊंटन ट्रेकिंग करताना दिसत आहे व याची चर्चा देखील सोशल मीडियावर जोरात रंगली आहे.  

Image result for virat kohli flying kiss

अनुष्का आणि विराटची जोडी बॉलिवूड तसेच क्रिकेट जगतामध्ये कायमच चर्चेत असते. दोघांची पहिली भेट कधी झाली, या आणि अशा अनेक गोष्‍टींबद्‍दल चाहत्‍यांना नेहमीच उत्‍सुकता असते. अनुष्का आणि विराट जेथे तेथे चर्चा असेच काहीसे वातावरण सोशल मीडियावर पाहायला मिळते. विराटच्‍या खेळीची जेवढी चर्चा होते तेवढीच चर्चा त्‍याच्‍या लव्‍हलाईफविषयी होते असे म्‍हटले तरी वावगे वाटायला नको. 

Image result for virat kohli with anushka

तरुणाईमध्‍ये विराटच्‍या टॅटूची क्रेझ

Image result for virat tattoo

विराटच्या खेळाचे ज्‍याप्रमाणे चाहते दिवाणे आहेत त्‍याप्रमाणे त्‍याच्‍या ड्रेसिंग स्‍टाईल असेल किंवा त्‍याच्‍या विविध हेअर स्‍टाईलचे करोडोच्‍या घरात चाहते आहेत. या सर्वात लक्ष वेधून घेतात ते विराटच्‍या शरीरावरचे टॅटूज. कारण त्याच्या शरीरावर आठपेक्षा अधिक टॅटू काढले आहेत. त्यामध्ये आई-वडिलांचे नाव, शिव, मठ, टोपी नंबर, ट्राइबल आर्ट, वृश्चिक, जपानी समुराई, गॉड आईज, ओम यांचा समावेश आहे. त्याच्या या टॅटूंच्यामूळे तरूणाईमध्ये टॅटूची क्रेझ तयार झाली आहे.