उमेशचा वेगवान चेंडू एल्गरच्या हेल्मेटवर आदळला, घ्यावा लागला बदली खेळाडू 

Last Updated: Oct 21 2019 7:42PM
Responsive image

Responsive image

रांची : पुढारी ऑनलाईन 

रांची येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत भारताच्या फास्ट बॉलर्सनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. भारताने पहिल्या डावात ४९७ धावा केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात १६२ धावात गुंडळून भारताने फॉलो ऑन दिला. भारताच्या तिखट माऱ्यासमोर दुसऱ्या डावातही आफ्रिकेची दाणादाण उडाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी आफ्रिकेचे ८ शिलेदार माघारी गेले होते. भारताचा मारा इतका तिखट होता की उमेश यादवचा एक उसळाता चेंडू  दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एल्गरच्या हेल्मेटवर आदळला त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. पण, समाधानाची बाब म्हणजे तो स्वतःहून मैदानाबाहेर गेला. 

भारताने फॉलो ऑन दिल्यानंतर आपला दुसरा डाव खेळण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. अवघ्या २२ धावात ४ फलंदाज पॅव्हेलियनच्या रस्त्याला लागले होते. पण, दुसऱ्या बाजूने सलामीवीर डीन एल्गर नेटाने फलंदाजी करत किल्ला लढवत होता. परंतु चहापानाला थोडाच अवधी शिल्लक असताना उमेश यादवचा उसळता चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला आणि तो मैदानावर कोसळला. तो जखमी झाल्याने चहापान लवकर घेण्यात आला. महत्वाची बाब म्हणजे तो स्वतःहून मैदानाबाहेर गेला त्यामुळे त्याची दुखापत गंभीर नाही असे दिसते. 

पण, आफ्रिकेने चहापानानंतर नव्या नियमानुसार एल्गरच्या ऐवजी बदली खेळाडू म्हणून थेउनिस दे ब्रुयन याला घेण्यात आले. भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी १३२ धावात आफ्रिकेचे ८ फलंदाज माघारी धाडले आहेत. त्यामुळे उद्या भारताच्या विजयाची औपचारिक्ताच बाकी राहिली आहे.