Wed, Feb 19, 2020 10:08होमपेज › Sports › केएल राहुलला डच्चू; सलामीसाठी रोहितला संधी?

केएल राहुलला डच्चू; सलामीसाठी रोहितला संधी?

Published On: Sep 12 2019 6:54PM | Last Updated: Sep 13 2019 5:16PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

वेस्ट इंडिजच्या यशस्वी दौऱ्यानंतर आता टीम इंडिया भारत दौऱ्यावर येत असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोरदार कामागिरी करण्यासाठी सज्ज झालीआहे. आफ्रिके विरुद्ध खेळण्यासाठी आज (दि.१२) बीसीसीआयने आज टीम इंडियाची घोषणा केली. यामध्ये अपेक्षेप्रमाणे लोकेश राहूलला वगळण्यात आले असून त्याच्या जागी रोहित शर्माला संधी देण्यात आली.

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रोहितला कसोटीमध्ये सलामी खेळण्याची संधी द्यावी असा सूर क्रिकेट जाणकारांसह चाहत्यांमधून येत होता. या मागणीची बीसीसीआयने दखल घेत रोहित शर्माला आफिक्रेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी देण्यात आली. आता रोहित सलामीला की मधल्या फळीत येणार याची उत्सुकता आहे. 

दक्षिण आफ्रिका संघ भारताच्या दौऱ्यावर येत आहे. भारतासोबत तीन टी-२० आणि तीन कसोटी सामने खेळणार आहे. टी- २० चे सामने १५ सप्टेंबरपासून सुरु होत आहेत. यासाठी संघ आधीच निवडण्यात आला होता. आफ्रिकेसोबत खेळण्यात येणाऱ्या तीन कसोटी सामान्यांसाठी बीसीसीआयने आज भारतीय संघाची निवड केली. यामध्ये लोकेश राहुलला वगळण्यात आले असून रोहित शर्माला संधी मिळाली आहे. तसेच भारत अ संघाकडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला ही कसोटीमध्ये संधी देण्यात आली आहे. 

 

India’s squad for 3 Tests: Virat Kohli (Capt), Mayank Agarwal, Rohit Sharma, Cheteshwar Pujara, Ajinkya Rahane (vc), Hanuma Vihari, Rishabh Pant (wk),Wriddhiman Saha (wk), R Ashwin, Ravindra Jadeja, Kuldeep Yadav, Mohammed Shami, Jasprit Bumrah, Ishant Sharma, Shubman Gill

— BCCI (@BCCI) September 12, 2019

लोकेश राहूलला अनेक वेळा संधी देण्यात आली, पण त्याला त्या संधीचे सोने करता आले नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याने ४ डावांत फक्त १०१ धावा केल्या. त्याच्या कामगिरीवर क्रिकेट तज्ज्ञांसह चाहत्यांकडूनही वारंवार टीका होत होती. दुसरीकडे रोहित शर्मा संघात असून देखिल त्याला कसोटीमध्ये खेळवण्यात आले नाही. रोहित शर्मा हा वर्ल्ड कप मालिकेमध्ये फार्ममध्ये होता व आहे. त्याचा फॉर्म पाहता त्याला कसोटीमध्ये संधी मिळणे आवश्यक होते पण त्याला संधी मिळू शकली नाही. राहूलची ढिसाळ कामगिरी पाहून त्याच्या जागी सलामीला रोहित शर्माला खेळवा असा सूर सर्वच स्तारातून उमटत होता. आज बीसीसीआयने आफ्रिका विरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी संघ निवड केली. त्यामध्ये लोकेश राहूलला डच्चू मिळाला तर रोहित शर्माला अपेक्षेप्रमाणे संधी मिळाली. आता मायदेशात आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यामध्ये रोहित कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. 

कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, शुभमन गील, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा.

दक्षिण आफ्रिका संघ : फाफ ड्यू प्लेसिस (कर्णधार), टेंबा बवुमा, थेयुनिस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गर, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडन मार्क्राम, सेनुरन मुथूसामी, लुंगी एनगिडी, ॲनरीच नोर्टजे, व्हेर्नोन फिलेंडर, डॅन पिएड्त, कागिसो रबाडा, रुडी सेकंड .   

कसोटी मालिकेचे वेळापत्रक 

सामना दिनांक  वेळ स्थळ 
१.  २ ते ६ ऑक्टोंबर सकाळी ९.३० विशाखापट्टणम
२.    १० ते १४ ऑक्टोंबर सकाळी ९.३० पुणे
३.  १९ ते २३ ऑक्टोंबर सकाळी ९.३० रांची