Mon, Aug 19, 2019 15:18होमपेज › Sports › माझ्या अपघाताच्या बातम्‍या म्‍हणजे अफवा : सुरेश रैना

माझ्या अपघाताच्या बातम्‍या म्‍हणजे अफवा : रैना

Published On: Feb 12 2019 3:15PM | Last Updated: Feb 12 2019 3:15PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारतीय संघाचा धडकाकेबाज फलंदाज सुरेश रैनाचा एका अपघातात मुत्‍यू झाल्‍याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे रैनाला चांगलाच त्रास सहन करतावा लागत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्‍यानंतर गेल्‍या पाच दिवसांपासून शांत असलेल्‍या रैनाने अखेर आज मौन सोडले आहे. ‘‘हा व्हिडिओ व्हायरल  झाल्‍याने मला खूप त्रास झाला आहे. माझ्या मृत्‍यूची ही अफवा आहे.’’ असे रैनाने म्‍हटले आहे. 

युट्यूबवर शेअर केलेल्‍या या व्हिडिओत रैनाचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखविण्यात आले आहे. यावर रैनाने ट्विट केले आहे. तो म्‍हणाला की, कार अपघातात माझा मृत्यू झाल्याची बोगस बातमी पसरवली जात आहे. ही बोगस बातमी माझे कुटुंब आणि मित्रांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अशा बोगस बातम्यांकडे दुर्लक्ष करा, अस माझे सर्वांना आवाहन आहे. देवाच्या कृपेने मी ठणठणीत आहे. ज्या चॅनेल्सने ही अफवा पसरवली आहे त्यांच्यावर लवकरच कारवाई होईल.’’ 

सुरेश रैना सध्या भारतीय संघात नाही. परंतु, तो उत्तर प्रदेशच्या रणजी संघाकडून खेळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या वर्षी जुलैमध्ये इंग्लंडविरोधात सुरेश रैनाने शेवटचा सामना खेळला होता.