गावसकर, गांगुलीला मिळणार आयसीएची मानद सदस्यता

Last Updated: Oct 20 2019 9:03PM
Responsive image

Responsive image

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचे (आयसीए) प्रमुख अशोक मल्होत्रा हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) होणारे नवीन अध्यक्ष सौरव गांगुली व सुनील गावसकर यांना संघटनेचा सदस्य बनविण्यास इच्छुक आहेत. मल्होत्रांना केवळ गांगुली व गावसकर यांच्या आयसीएच्या मानद सदस्यतेसोबतच माजी खेळाडूंच्या पेन्शन योजनेवर देखील काम करायचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

आयसीएचे जवळपास 1500 सदस्य आहेत. मल्होत्रा यांची बिनविरोध निवड झाली; पण बीसीसीआयच्या हा संघटनेत पुरुष आयसीए प्रतिनिधीच्या रूपात अंशुमन गायकवाड यांची निवड झाली. त्यांनी कीर्ती आझाद व राकेश धुर्वेंना पराभूत केले. शांता रंगास्वामी एकमात्र महिला उमेदवार होत्या. त्यामुळे त्यांची निवड झाली. विशेष म्हणजे या संघटेमध्ये निवृत्त झालेल्या भारतीय क्रिकेटर्सना सदस्य बनता येते.