'रोहितने माझ्या 'त्या' आठवणींना उजाळा दिला'

Last Updated: Jan 20 2020 3:34PM
Responsive image

 

 

 

 


बेंगळूरु : पुढारी ऑनलाईन 

भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा सामना जिंकून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या २८७  धावांचे आव्हान ३ गड्यांच्या मोबदल्यात १५ चेंडू राखून पार केले. रोहित शर्माने दमदार ११९ धावांची शतकी खेळी केली. या खेळीवर भारतीय चाहतेच नाही तर पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरही जाम खुश झाला. त्याने रोहित आणि भारतीय संघाचे तोंडभरून कौतुक केले. तसचे रोहितने मारलेल्या अप्पर कटने त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे त्याने सांगितले. ही सर्व मते त्याने आपल्या युट्युब चॅनेलवर व्यक्त केली. 

वाचा : 'विराटचा चमचा' प्रतिक्रियेवर आकाश चोप्राचा पलटवार

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे पुढचे दोन सामने भारताची परीक्षा पाहणारे असणार असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण, भारताने पुढचे दोन्ही सामने जिंकत मालिका खिशात टाकली. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात रोहित शर्माने केलेल्या फलंदाजीचे सर्वांकडूनच कौतुक होत आहे. त्याची धडाकेबाज शतकी खेळी दबावावेळी आल्याने त्याचे विशेष महत्व आहे. रोहितच्या या कामगिरीवर शोएब अख्तरही जाम खुश झाला. 

वाचा : हिटमॅन रोहितने उलगडले धडाकेबाज खेळीचे रहस्य!

तो आपल्या यू ट्युब चॅनेलवर बोलताना म्हणाला 'चिन्नास्वामीवर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ठोकून काढले. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला लहान मुले समजून त्यांच्याशी खेळत होते. रोहित आपल्याच लयीत होता. तो कोणता चांगला बॉल आहे कोणता नाही याची तमा बाळगत नव्हता. त्याच्याकडे भरपूर वेळ असतो.' शोएब रोहितची स्तुती करताना पुढे म्हणतो 'चिन्नास्वामी सारख्या फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर रोहित शर्मा दया माया दाखवत नाही. त्याने गोलंदाजांना मारुन मारुन त्याचं भरीत बनवले. त्याने झाम्पाला मारले, स्टार्कला मारले. त्याने जो कट शॉट मारला त्यामुळे सचिनने मला जो अप्पर कट मारला होता त्याची आठवण झाली. आज ऑस्ट्रेलिया नेस्तनाबूत झाली.'