टोळधाडीच्या ट्विटवरुन संजय मांजरेकर ट्रोल

Last Updated: May 29 2020 10:56AM
Responsive image


नवी दिल्ली :  पुढारी ऑनलाईन 

भारताचे माजी खेळाडू आणि समोलोचक संजय मांजरेकर पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत. त्यांना देशातील शेतकरी मोठ्या टोळधाडीमुळे चिंताग्रस्त असताना त्या संदर्भात विनोदबुद्धीने ट्विट करणे महागात पडले आहे. मांजरेकरांनी आपण काही पीकं नाही असा विनोद केला होता. त्यावर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले. 

वाचा : प्रीमियर लीग 17 जून पासून पुन्हा सुरु होणार 

संजय मांजरेकारांनी काल ( दि. 28 ) आपल्या ट्विटवर हँडलवरुन 'लोक हो, टोळधाडीला घाबरण्याचे काहीच कारण नाही. आपण काही पीकं नाही.' असे ट्विट केले होते.' या ट्विटवरुन नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. काहींनी 'अत्यंत असंवेदनशील तुम्ही असे कसे म्हणू शकता, जर शेतकरी ट्विटरवर असते तर त्यांनी तुम्हाला तुकड्या तुकड्यात बाहेरचा रस्ता दाखवला असता.' अशी प्रतिक्रिया दिली. तर एकाने ' दुर्दैवाने आम्ही पीकांवर अवलंबून आहे. पण, तुमच्या बाबतीत मला शंका आहे, तुम्ही दुसरं काही खात असाल.' असे ट्विट केले. 

वाचा : टी-२० वर्ल्डकपसाठी आयसीसीची सावध भूमिका

सरकारने सध्या घोंघावणारे टोळधाडीचे संकट हे गेल्या तीन दशकातील सर्वात मोठे आणि घातक संकट असल्याचे सांगितले आहे. या वाळवंटी टोळांचा मोठा थवा पश्चिमी आणि मध्य भारतामधील उभी पीकं नष्ट करत आहेत. या टोळधाडीचा रोख आता महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पंजाबकडे वळला आहे. यापूर्वी त्यांनी राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणात धुमाकूळ घातला. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली सरकारनेही या टोळधाडीसंदर्भात इशारा दिला आहे. याचबरोबर संबधित प्रशासनाला पीकांवर किटकनाशकं फवारण्याचा आदेश दिले आहेत.