Fri, Jul 03, 2020 00:53होमपेज › Sports › हिटमॅन रोहितकडून चहलची फिरकी! (Video)

हिटमॅन रोहितकडून चहलची फिरकी! (Video)

Last Updated: May 28 2020 3:05PM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा मैदानात जशी बॅटिंग करत असतो तशीच तुफानी सोशल मीडियावरही करत असतो. त्याचे अनेक गमंतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडिओजमध्ये नेहमी रोहित युजवेंद्र चहलला टार्गेट करत असल्याचे पाहायला मिळते. संघातील करामती चहलच्या अनेक कृतींची नक्कल रोहित करत असतो. त्याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियवर व्हायरल होत आहे. 

रोहित शर्माने इन्स्टाग्राम अकाऊंवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रोहित अनोख्या प्रकारच्या उड्या मारत असल्याचे पाहायाल मिळत आहे. हा मजेशीर व्हिडिओला मध्ये रोहितने हा माझा छोटा भाऊ युजवेंद्र चहल आहे. तो क्षेत्ररक्षणा दरम्यान असाच उड्या मारत असतो अशी कॅप्शन दिली आहे. 

यापूर्वी संघाचा कर्णधार विराट कोहलीनेदेखील एका लाईव्ह चॅट दरम्यान, चहलची खिल्ली उडवली होती. संघाचा करामती चहलदेखील सोशल मीडियावर चांगला ॲक्टिव्ह असतो. चहल टीव्ही द्वारे चहल अनेक साथीदार खेळाडूंचे मजेशीर मुलखती घेत असतो.