आयपीएल : अश्‍विन दिल्‍ली कॅपिटल्सकडे

Last Updated: Nov 09 2019 2:07AM
Responsive image


नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था

भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्‍विन इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामात आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. शुक्रवारी दिल्ली आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन संघांत ट्रेड झाली आणि त्यानुसार दिल्लीने अश्‍विनसाठी 1.5 कोटी रुपये मोजले आहेत. तर, डावखुरा फिरकीपटू जगदिशा सुचिथ याला पंजाबला दिले आहे. 33 वर्षीय अश्‍विनला मागील लिलावात 7.6 कोटी मिळाले होते आणि त्याला दिल्लीकडून तितक्याच रकमेची अपेक्षा आहे.

याआधीच्या चर्चेनुसार अश्‍विनसाठी दिल्ली दोन खेळाडू पंजाबला देण्यास तयार होते. त्यात न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट याचे नाव होते. परंतु, दिल्लीला पंजाबकडे केवळ सुचिथ द्यावा लागला. ‘या डीलमुळे प्रत्येकजण आनंदी आहे. अश्‍विनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,’ असे मत पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांनी व्यक्‍त केले.  दिल्ली कॅपिटल्सने मोठ्या थाटात अश्‍विनचे स्वागत केले आहे.

अश्‍विनच्या जाण्याने आगामी मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे कर्णधारपद भारतीय संघाचा सलामी फलंदाज के. एल. राहुलकडे दिले जाऊ शकते. के. एल. राहुल गेले दोन हंगाम पंजाब संघासोबत आहे. गेल्या हंगामात त्याने चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे पंजाब संघाचे कर्णधारपद के. एल. राहुलकडे सोपविण्यात येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अखेर ठरलं! ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री होणार; उद्धव ठाकरेंनी प्रस्ताव स्वीकारला


 'तो' कॅच घेतला रोहित शर्माने, पण सोशल मीडियावर हवा संजय राऊतांची! 


खांदेपालट श्रीलंकेत, पण भारताच्या कपाळावर का चिंतेच्या रेषा?


बैठकीतून बाहेर पडताच मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे काय म्हणाले? 


अखेर शरद पवारांनीच दिली गोड बातमी; मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सर्वसंमती!


पुणे : मराठा सरदारांच्या राज्यभरातील वशंजांचे एकत्र येऊन शस्त्रसंपदेचे प्रदर्शन! (video)


बांगला देशने खेळवले १२ फलंदाज 


'अशी' कामगिरी करणारा इशांत शर्मा ठरला पहिला भारतीय गोलंदाज!


सांगली : पोटच्या पोरानं ठोकरलं, नंतर पोरीनंही दार लाऊन घेतलं; आईनं बसस्थानकात काढली रात्र!


संजय राऊतांच्या तिखट शेरो शायरीनंतर आता नवाब मलिकांचाही 'शायराना' अंदाज!