Sun, Mar 24, 2019 10:28



होमपेज › Sports › pro kabaddi : युपीला नमवत पटणाचा पहिला विजय

pro kabaddi : युपीला नमवत पटणाचा पहिला विजय

Published On: Oct 11 2018 7:32PM | Last Updated: Oct 11 2018 9:10PM



चेन्नई : पुढारी ऑनलाईन 

सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून दोन्ही संघाकडून सुरू असलेल्या जोरदार चढाया आणि बोनसच्या गुणाची लयलुटीमुळे हा सामना मोठा रोमहर्षक झाला. दोन्ही संघाच्या रेडरकडून आक्रमक खेळी करत बोनस तसेच गुणांची कमाई सुरूच होती. सुरूवातीस युपीचा संघ आघाडीवर हाेता. त्यानंतर पटणाने जोरदार मुसंडी मारत पहिला ऑल आउट केला. मात्र युपीच्या योध्दांनी काही वेळातच याची परफेड केली. प्रदीप नरवाल ने सुपर टेन गुण घेत या सामन्यात आपली चमक दाखवून दिली. तर पटणाने युपीला या सामन्यात दोनवेळस ऑल आउट केले. युपीच्या श्रीकांत जाधवनेही सुपर टेन गुणांची कमाई केली. मात्र अखेरच्या क्षणी पटणाने हा सामना (४३-४१) २ गुणांनी जिंकत या हंगामातील आपल्या संघाचा पहिला विजय नोंदवला.   

पहिला हाफ

पटणाच्या प्रदीप नरवालच्या पहिल्याचा रेडला त्याची पकड करत युपी योध्दांनी बाद केले. सरूवातीपासूनच युपीच्या संघाचा बचावफळी चांगली कामगिरी केली. युपीच्या टॅकलला भेदण्यास पटणाकडून जोरदार चढाई करण्यात आली. या रोमहर्षक सामन्यात सुरूवातीस आघाडीवर असलेल्या युपीवर पटणाने ऑल आउट करत जोरदार मुसंडी मारली. मात्र काही वेळातच युपीच्या योध्दांनी यांची परतफेड केली. दोन्ही संघाकडून पहिल्यापासून आक्रमक खेळी सुरू होती. तर पटणाच्या प्रदीप नरवाल ने सुपर टेन गुण मिळवला. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघानी २०-२० गुण करीत बरोबरी साधली. 

दुसरा हाफ

पटणाने युपी योध्दाला दुसऱ्या हाफच्या काही वेळातच ऑल आउट केले. दोन्ही संघाकडून चढाईत गुणाची लयलुट सुरूच ठेवली होती. तर दोन्ही संघाच्या रेडरकडून आक्रमक खेळी करत बोनस तसेच गुणाची कमाई सुरूच होती. युपीकडून रिशांक देवाडिंगा, श्रीकांत जाधव, प्रशांत कुमार यांनी जोरदार चढाई करत संघास गुण मिळवून दिेले. तर पटणासंघाकडून प्रदीप नरवाल, दिपक नरवाल, विकास काले यांनी जोरदार चढाई केल्या. पटणा संघास रिशांक देवाडिंगाची पकड केल्याने सुपर टॅकल गुण मिळाला. दुसऱ्या हाफमध्ये युपीने पटणाचा ऑल आउट करत गुण बरोबरीत आणले. या सामन्यात दोन्ही संघाकडून बोनसची लयलुट सुरू होती. युपीच्या श्रीकांत जाधवनेही सुपर टेन गुणांची कमाई केली. मात्र अखेरीस हा सामना पटणाने २ गुणांनी जिंकला.