Sun, Mar 24, 2019 10:25होमपेज › Sports › pro kabaddi : बंगाल वॉरियर्सची विजयी सुरूवात

pro kabaddi : बंगाल वॉरियर्सची विजयी सुरूवात

Published On: Oct 11 2018 9:07PM | Last Updated: Oct 11 2018 10:37PMचेन्नई : पुढारी ऑनलाईन 

घरच्या मैदानावर झालेल्या शेवटच्या सामन्यातही अखेर तमिळ थलायवाज संघाला हार पत्करावी लागली. बंगाल वॉरियर्सने या हंगामातील या पहिल्याच सामन्यात थलायवाजला नमवत विजयी सुरूवात केली. या ही सामन्यात थलायवाजच्या स्टार खेळाडू अजय ठाकूर, जसबीर सिंग आणि मनजित चिल्लर यांच्याकडून निराशजनक कामगिरी झाली. रेडर पाँइट आणि टॅकल पाँइट मध्येही बंगालचा संघ आघाडीवर होता. बंगालच्या मनिंदर सिंग, महेश गौंड यांनी जोरदार चढाय्या करत थलायवाजवर कायम आघाडी ठेवली. या सामन्यात बंगालने थलायवाजचा दोन वेळा ऑल आउट करत अखेर या सामन्यात ३६-२७ अशा गुणफरकानी विजय मिळवला.  

पहिला हाफ

जसविर सिंगने आपल्या पहिल्या रेडरमध्येच संघाला गुणाची कमाई करून देण्यास सुरुवात केली. तर बंगालकडूनही मनंदीर सिंगने उत्कृष्ट चढाई करत गुण मिळवून दिेले. पहिल्या काही मिनिटातच बंगाल आघाडीवर होते. मात्र थलायवाज संघाने हा गुणतक्ता बरोबरीत आणून ठेवला. थलायवाज संघास उत्कृष्ट पकडीमुळे सुपर टॅकल गुण मिळाला. बंगाल वॉरियर्सने आपल्या संघावरील ऑल आउटची वेळ दोन वेळा बचावली. तर बंगालने थलायवाजला ऑल आउट केले. अखेर पहिल्या हाफमध्ये बंगाल आघाडीवर होते. 

दुसरा हाफ

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीपासूनच बंगालचा संघ आपली आघाडी टिकवून होता. मनिंदर सिंह, महेश गौंड यांनी जोरदार चढाय्या करत संघाची आघाडी कायम ठेवली. थलायवाज दुसऱ्या हाफमध्येही ऑल आउट झाले. या सामन्यात थलायवाजला दोनदा ऑल आउटचा सामना करावा लागला. रेडर पाँइट आणि टॅकल पाँइट मध्येही बंगालचा संघ आघाडीवर होता. थलायवाजच्या जसविर सिंग, अजय ठाकूर या रेडरकडुन याही सामन्यात निराशाजनक कामगिरी झाली. तर बंगालच्या मनिंदर सिंग, महेश गौंड यांनी आपल्या पहिल्याच सामन्यात जोरदार चढाय्या करत उत्कृष्ट कामगिरी केली. अखेर शेवटच्या क्षणापर्यत थलायवाज संघाला बंगालवर आघाडी मिळवता आली नाही. अखेर ३६-२७ अशा गुणफरकानी थलायवाजला हार पत्करावी लागली.