'थांबा माझी बॅटच बोलेल' पृथ्वी शॉचे बोलके हावभाव 

Last Updated: Nov 17 2019 6:56PM
Responsive image


पुढारी ऑनलाईन डेस्क 

भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याने अखेर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले. त्याने प्रथम श्रेणी सईद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत  आसामविरुद्धच्या सामन्यात झोकात पुनरागमन केले. त्याच्यावर उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्ररणी बीसीसीआयने ८ महिने बंदी घातली होती. त्यानंतर या सामन्यात दमदार अर्धशतक ठोकले. यानंतर त्याने बॅट उंचावून हावभाव केले. आता माझी बॅटच बोलेल असे त्याने या हावभावाच्या माध्यमातून सुचित केले.

भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉने सचिनचे बरेच रेकॉर्ड मोडले त्यामुळे त्याची तुलना सचिनशी केली जाऊ लागली. परदेश दौऱ्यावेळी धावा करुन त्याने कसोटी संघात कमी वेळात आपली जागा निर्माण केली. पण, ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर सराव सामन्यावेळी त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर रहावे लागले. त्यातच त्याने एका कफ सिरपचे सेवन केले. त्यात बंदी असलेले उत्तेजक द्रव्य अढळल्याने त्याच्यावर ८ महिन्यांचा बंदी घालण्यात आली. 

हा बंदीचा काळ संपल्यानंतर त्याने मुंबईकडून सईद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेमार्फत पुनरागमन केले. त्याने आसामविरुद्धच्या सामन्यात ३९ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. त्यानंतर त्याने बॅट उंचावून थांबा माझी बॅटच बोलेल असे आवभाव केले. या हावभाव करण्यावर चाहत्यांनी टीकाही केली आहे. दरम्यान, रोहितने कसोटीत सलामीला येण्याचा निर्णय घेत धावांचा रतीब घातला. त्यानंतर मयंक अगरवालनेही ८ कसोटीत दोन द्विशतके ठोकत आपली जागा पक्की केली आहे. त्यामुळे पृथ्वी शॉला संघात स्थान मिळवण्यासाठी बरेच कष्ट करावे लागणार आहेत.