होमपेज › Sports › पाकच्या यासिरने मोडले ८२ वर्षापूर्वीचे रेकॉर्ड!

पाकच्या यासिरने मोडले ८२ वर्षापूर्वीचे रेकॉर्ड!

Published On: Dec 06 2018 3:43PM | Last Updated: Dec 06 2018 3:18PM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

अबुधाबी येथे सुरू असलेल्या पाकिस्तान विरूद्ध न्युझीलंड कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी अनोखा विक्रम घडला. कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळींचा टप्पा सर्वात जलद गतीने पार करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या यासिर शाह याने केला. पाकच्या या फिरकी गोलंदाजाने ८२ वर्षापूर्वीचे रेकॉर्ड मोडीत काढले.

तिसऱ्या कसोटी सामन्यात विल समरविलेचा बळी मिळवत यासिरने २०० बळींचा टप्पा पार करत विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर क्लेरी ग्रीमट यांच्या नावावर होता. त्यांनी ३६ कसोटीमध्ये २०० बळी घेतले होते. यासिरने ३३ कसोटी सामन्यातच २०० बळी घेण्याचा विक्रम केला. 

Image may contain: 2 people, text

भारताच्या रविचंद्रन अश्विनने ३७ कसोटीत २०० बळी टिपण्याचा कामगिरी केली होती. पाकिस्तानच्या वकार युनिसने न्युझीलंड विरूद्धच ३८ कसोटी सामन्यात २०० बळींचा टप्पा पार केला होता. सर्वात जलद २०० बळी घेण्याच्या यादीत पहिले तीन फिरकी गोलंदाज असून त्यातील पहिले दोन लेग स्पिनर आहेत.