Thu, Aug 22, 2019 14:59होमपेज › Sports › जेव्हा नाराज रायडू विजय शंकरला भेटतो...

जेव्हा नाराज रायडू विजय शंकरला भेटतो...

Published On: Apr 18 2019 4:37PM | Last Updated: Apr 18 2019 4:31PM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

दोन दिवसापूर्वी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. गेल्या दीड वर्षापासून भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या अम्बाती रायडूला निवड समितीने संघात स्थान दिलेले नाही. त्याच्या जागी विजय शंकरला स्थान दिले. या विश्वचषकाच्या निवडीनंतर प्रथमच बुधवारी झालेल्या चेन्नई विरूद्ध हैद्राबाद सामन्यात ते दोघे आमने-सामने आले होते. 

बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नईची विजयी एक्सप्रेस हैद्राबादने अखेर रोखली. चेन्नईने हैदराबादपुढे १३३ धावांचे आव्हान ठेवले होते. हैदराबादच्या संघाने हे आव्हान यशस्वीरित्या पेलत विजय साकारला. या विजयासोबत क्रिकेट चाहत्यांच्या मनातील एक शंका दूर झाली. ती म्हणजे विश्वचषकाच्या निवडीनंतर प्रथमच अम्बाती रायडू आणि विजय शंकर आमने-सामने आले होते. कारण संघ निवडीनंतर रायडूने ट्विट करत निवडकर्त्यांवर खोचक शब्दात टीका केली होती. त्यामुळे नाराज असणारा रायडू मैदानात काय प्रतिक्रीया देईल याची सर्वांना चिंता लागली होती. पण दोघांनी मनात कोणतीही कटूता न बाळगता हस्ताआंदोलन करत गळाभेट घेतली. त्यामुळे चाहत्यांना सर्व काही आलबेल असल्याचा सुखद धक्का मिळाला. 

अम्बाती रायडूने वर्ल्डकपमध्ये स्थान न मिळाल्यानंतर निराशा व्यक्त करीत निवडकर्त्यांवर खोचक शब्दात टीका केली. त्याने ‘वर्ल्डकप पाहण्यासाठी नुकताच एक नवीन थ्रीडी चष्मा ऑर्डर केला आहे.’ असे ट्विट केले हाेते. असे ट्विट  करण्यामागचे कारण म्हणजे, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात योगदान विजय शंकर देऊ शकतो, असे निवडकर्त्यांनी विजय शंकरच्या निवडीमागचे कारण सांगितले होते.