Sat, Jul 20, 2019 10:35होमपेज › Sports › पंतचे ख्वाजाला रेशीम 'चिमटे'

पंतचे ख्वाजाला रेशीम 'चिमटे'

Published On: Dec 07 2018 7:08PM | Last Updated: Dec 07 2018 7:08PM
ॲडलेड : पुढारी ऑनलाईन 

ॲडलेडच्या मैदानात पहिल्या कसोटीत दुसऱ्यादिवशी भारतीय गोलंदाजांचे जोरदार पुनरागमन पाहायला मिळाले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियानं ७ विकेट गमावून १९१ रन केले होते. भारताकडून आर.अश्विनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी २-२ बळी घेतले. सामन्यादरम्यान यष्टीरक्षक ऋषिभ पंत  ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाचे स्लेजिंग करताना दिसला. 

कसोटीच्या दुसऱ्यादिवशी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाच्या नाकात दम आणला. अनेकवेळा मैदानात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून  स्लेजिंग केल्याचे प्रकार क्रिकेट रसिकांनी पाहिले आहेत. याचेच प्रत्युत्तर भारताने दिलेले ॲडलेडच्या मैदानात पाहायला मिळाले आहे. 

उस्मान ख्वाजा १२५ चेंडूमध्ये २८ धावा काढून ख्वाजा झेलबाद झाल्याचे दिसले. त्याचा जल्लोषही भारतीय फलंदाजांनी केला  पण पंचांना हा निर्णय मान्य नव्हता, त्यावेळी  पंतनं कर्णधार विराट कोहलीला डीआरएस घ्यायला लावला. डीआरएसमध्ये उस्मान ख्वाजाच्या हाताला चेंडू लागल्याचे पाहायला मिळाल्याने ख्वाजा बाद झाला असल्याचा निर्णय देण्यात आला. त्यावेळी सगळेच जण पुजारा नसतात, असं ऋषभ पंत ख्वाजाला म्हणाला. ऋषभ पंतचं हे वक्तव्य स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झाले आहे.