Tue, May 30, 2017 04:05
29°C
  Breaking News  


होमपेज › Sports › मुंबई आयपीएलच्या अंतिम फेरीत

मुंबई आयपीएलच्या अंतिम फेरीत

By pudhari | Publish Date: May 19 2017 11:56PM


बेंगळूरू : वृत्तसंस्था
मुंबई इंडियन्सने आपल्या दुसऱ्या क्वालीफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर ६ गडी राखून विजय मिळवत आयपीएल-१०च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईने कोलकाताच्या १०८ धावांचे आव्हान १५ षटकांत सहज पार केले. अंतिम फेरीत मुंबई आणि पुणे यांची पुन्हा एकदा चुरस पाहायला मिळणार आहे. साखळी सामन्यात मुंबईने पुण्याला दोन सामन्यात धुला चारली होती मात्र पहिल्या क्वालीफायर सामन्यात इंडियन्सला पुण्याकडून हर पत्करावी लागली होती. रविवारी हैदराबादच्या स्टेडियमवर दोन्ही संघात लढत होणार आहे. 
तत्पूर्वी मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेत कोलकाता नाईट रायडर्सला फलंदाजीस निमंत्रित केले. रायडर्सला फलंदाजी देण्याचा आपला निर्णय अचूक असल्याचे काहीवेळातच सिद्ध केले. फिरकीपटू कर्ण शर्माने ४ षटकांत केवळ १६ धावा देऊन ४ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराने तीन षटकात ७ धावा देऊन तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल जॉन्सनेही कोलकाताच्या दोन महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केलं.विस्फोटक ख्रिस लिन, सुनील नरेन, रॉबीन उथप्पा गौतम गंभीरला चमक दाखवता आली नाही. सुर्यकुमार यादव आणि इशांक जग्गीने अर्धशतकी भागीदारी रचून संघाला सावरलं. 
१०८ धावांचा पाठलाग करताना कोलकाताने मुंबईच्या तीन फलंदाजांना झटपट बाद करून सामन्यातील चुरस वाढवली. मात्र रोहित शर्मा आणि कुणाल पंड्याने चौथ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी रचली. रोहितने २६ धावा केल्या, तर कुणाल पंड्याने सर्वाधिक नाबाद ४५ धावांची मॅच विनिंग खेळी साकारली.