Tue, Mar 26, 2019 07:39होमपेज › Sports › भारतीय बनावटीच्या चेंडूवर कोहलीची नाराजी

भारतीय बनावटीच्या चेंडूवर कोहलीची नाराजी

Published On: Oct 11 2018 6:24PM | Last Updated: Oct 11 2018 6:34PMनवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

कर्णधार विराट कोहलीने भारतामध्ये तयार करण्यात येणाऱ्या एसजी चेंडूवर नाराजी व्यक्‍त केली आहे. विराटच्या मते इंग्लंडमध्ये तयार होणारा ड्यूक चेंडू सामन्यामध्ये वापरला पाहिजे. यामागील कारणदेखील त्याने स्पष्ट केले आहे.

एसजी चेंडूच्या गुणवत्तेवर नाराजी दर्शवत विराट म्हणाला, मी मानतो की ड्यूक हा चेंडू कसोटी क्रिकेटसाठी सर्वात उपयुक्त आहे. मी विनंती करतो की, जगभरात याच चेंडूचा वापर करावा. कारण त्या चेंडूची गती जलद आणि सरळ आहे. चेंडू वापरण्यासाठी आयसीसीचे कोणतेही विशिष्ट दिशानिर्देश नाहीत. प्रत्येक देश वेगळ्या प्रकारच्या चेंडूचा वापर करतो. भारत स्वदेशी बनावटीच्या चेंडूचा वापर करतो. 

ड्यूक चेंडूचा इंग्लंड, वेस्ट इंडिज तर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि पाकिस्तान कूकाबूरा चेंडूचा वापर करत असतात. कोहलीच्या पूर्वी फिरकीपटू अश्विनने म्हटले की, एसजीच्या तुलनेत कूकाबाराच्या चेंडू सोबत खेळणे अधिक चांगले वाटते. 

अश्विनच्या या बोलण्यावर विराटला विचारले असता, विराट म्हणाला मी त्याच्या मताशी सहमत आहे. पाच ओव्हरमध्ये चेंडू खराब होतो. यापूर्वी मी असे कधीच पाहिलेले नाही. पहिल्यांदा या चेंडूचा वापर चांगला होत होता पण माहिती नाही आता हा चेंडू खराब कसा काय झाला. तसेच तो पुढे म्हणाला, ड्यूक चेंडूची गुणवत्ता अजुनही चांगली आहे. कुकाबुराचीदेखील गुणवत्ता चांगली वाटते, पण कधी अनुभवली नाही.