Tue, Jun 25, 2019 15:59होमपेज › Sports › धोनी झाला दस हजारी 'मनसबदार'!

धोनी झाला दस हजारी 'मनसबदार'!

Published On: Jan 12 2019 1:35PM | Last Updated: Jan 12 2019 1:39PM
सिडनी: पुढारी ऑनलाईन

सिडनी मैदानात सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात महेंद्र सिंह धोनीने १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. हा टप्पा पार करण्यासाठी केवळ एका धावेची गरज धोनीला होती. १० हजारा धावांमधील १७४ धावा धोनीने आशिया एकादश संघाकडून खेळताना काढल्या होत्या. एकदिवसीय सामन्यात भारताकडून १० हजार धावा करणारा धोनी पाचवा भारतीय ठरला आहे. सर्वाधिक धावांचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. 

 

धोनीच्या नावावर १० हजार १७३ धावा आहेत, मात्र, त्यापैकी केवळ ९९९९ धावा या भारताकडून खेळताना केल्या होत्या. उर्वरित धावा त्याने आशिया एकादश संघाकडून खेळताना केल्या होत्या. त्याने २००७ मध्ये आशिया एकादश संघाचे प्रतिनिधित्व करताना आफ्रिका एकादश संघाविरुद्ध १७४ धावा केल्या होत्या. 

भारताकडून एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज 

फलंदाज          सामने            धावा

सचिन तेंडुलकर   ४६३          १८ हजार ४२६ 

सौरभ गांगुली       ३०८       ११ हजार २२१ 

राहुल द्रविड         ३४०      १० हजार ७६८ 

विराट कोहली       २१६       १० हजार २३२