Tue, Feb 18, 2020 12:51होमपेज › Sports › विराटचा 'तो' व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल; See Video

विराटचा 'तो' व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Last Updated: Jan 28 2020 1:41PM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे. तिसरा सामना उद्या (२९ जानेवारी रोजी) होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या स्टंटबाजीचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

विराट कोहली हा उत्कृष्ट खेळीसोबत फिटनेसबाबत कमालीचा आग्रही आहे. किवींबरोबर तिसरा सामना होण्यापूर्वी विराटने जिममधील वर्कआउटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो एक स्टंट करत असल्याचे दिसत आहे. जिममध्ये विराटच्या समोर दोन बॉक्स ठेवले आहेत. विराट त्या बॉक्सवर उडी मारताना पाहायला मिळते. 

विराटच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. क्रिकेटपटू हरभजन सिंगने देखील विराटच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

इडन पार्कवर झालेल्या पहिल्या दोन सामन्यात भारताने यजमान न्यूझीलंडचा पराभव केला होता. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने दिलेले २०४ धावांचे आव्हान भारताने ६ चेंडू राखून तर दुसऱ्या सान्यात १५ चेंडू आणि ७ विकेट राखून पार केले होते. आता हॅमिल्टन येथे होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न विराट सेनेचा असणार आहे.