Thu, Jun 04, 2020 03:47होमपेज › Sports › गोलंदाजीदरम्यान अश्विनची शिखरने केली ‘बटलर’ चेष्टा 

गोलंदाजीदरम्यान अश्विनची शिखरने केली ‘बटलर’ चेष्टा 

Published On: Apr 20 2019 11:28PM | Last Updated: Apr 20 2019 11:28PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

यंदाच्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार अश्विनने ज्या प्रकारे राजस्थानच्या जोस बटलरला धावबाद केले होते. यावरुन प्रचंड वाद निर्माण झाला होता. बरेच दिवस त्याच्यावर क्रिकेट वर्तुळात काथ्याकुट करण्यात आला होता. अश्विनने आपल्या कृतीचे समर्थन केले होते. तर बऱ्याच जाणांनी ही कृती खिलाडू वृत्तीची नाही असे मत नोंदवले होते. याविषयी बऱ्याच जणांची मते काहीही असली तरी यानंतर प्रत्येक संघातील फलंदाज अश्विनला टरकून राहू लागला आहे. त्यातच आजच्या सामन्यातही अशाच प्रकारचा किस्सा अश्विन आणि शिखर धवन यांच्यात झाला. 

अश्विन सामन्याचे १२ वे षटक टाकण्यासाठी आला. त्यावेळी समोर फलंदाजी करण्यासाठी श्रेयस अय्यर होता. तर नॉन स्ट्राईकला अर्धशतक ठोकणारा शिखर धवन होता. षटकातील ३ चेंडू टाकण्याआधी  अश्विन थांबला बहुदा तो शिखर क्रिज सोडून बाहेर जात आहे काय याची चाचपणी करत असावा. याचा अंदाज येताच शिखर पटकन क्रिजमध्ये परतला. पण, त्यानंतर पुढचा चेंडू टाकताना  शिखरने क्रिजच्या बाहेर पडतोय  असे जाणीवपूर्वक भासवण्याचा प्रयत्न करत अश्विनला डिचण्याचा प्रयत्न केला. 

या सामन्यात शिखर धवनने आक्रमक फलंदाजी करत दिल्लीला विजयाच्या उंबरठ्यावर नेवून ठेवले. त्याने ४१ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. यात ७ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. त्याने श्रेसय अय्यर बरोबर दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागिदारी रचली.