बेडवर पडलेल्या पांड्याचा खोडसाळपणा, झहीरचा अपमान करणारे ट्विट? 

Last Updated: Oct 09 2019 8:34PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखण्याने बेजार झाला होता. अखेर त्याने दुखऱ्या पाठीवर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया करवून घेतली. सध्या तो बेड रेस्ट करत आहे. पण त्याने रेस्ट घेण्याऐवजी सोशल मीडियावर खोडसाळपणा करणे पसंत केले आहे. त्याच्या या खोडसाळपणाचा क्रिकेट रसिकांनी चांगलाच समाचार घेतला. त्याने भारताचा माजी जलदगती गोलंदाज झहीर खानला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हा खोडसाळपणा केला. 

काल (दि.८) भारताचा माजी डावखुरा जलदगती गोलंदाज झहीर खानचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसादिवशी त्याच्या चाहत्यांनी आणि आजी माजी क्रिकेट सहकाऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. या सर्व शुभेच्छांमध्ये सर्वात जास्त हार्दिक पांड्याच्या ट्विटचीच चर्चा झाली. त्याने एका स्थनिक स्पर्धेतील जुना व्हिडिओ शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले की 'वाढदिवसाच्या शुभेच्छा झॅक... आशा आहे की मी जसा बॉल मैदानाबाहेर मारला त्याप्रमाणे तूही मारशील.' पांड्याचा हा व्हिडिओ एका स्थानिक स्पर्धेतील आहे. ज्यात पांड्याने झहीरने टाकलेला एक बॉल टोलवत सिक्सर मारला होता. 

पांड्याच्या या खोडसाळ ट्विटवर जहीरने प्रत्युत्तर देताना ट्विट केला की 'शुभेच्छांसाठी आभार पांड्या, माझी फलंदाजी कधीही तुझ्या इतकी चांगली नव्हती पण, माझा वाढदिवस हा तू त्या सामन्यातील फेस केलेल्या माझा पुढचा चेंडू इतका चांगला आहे.' तसेच क्रिकेट चाहत्यांनी पांड्याच्या या खोडसाळपणाचा चांगलाच समाचार घेतला. त्याला सन्मान द्यायला शिक नाहीतर तुझी दांडी गुल होईल. यश आणि पैसा सहजतेने आला की असेच होणार, अकड आणि घमेंड बघा जरा. अशा प्रतिक्रियांचा सामना त्याला करावा लागला.