Thu, Mar 21, 2019 09:03होमपेज › Sports › पांड्या, राहुलला पहिल्या वनडेतून वगळले; चौकशी होईपर्यंत सरावही नाही

पांड्या, राहुलला पहिल्या वनडेतून वगळले 

Published On: Jan 11 2019 5:04PM | Last Updated: Jan 11 2019 8:07PM
सिडनी : पुढारी ऑनलाईन 

हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना ऑस्ट्रेलिया विरूध्दच्या पहिल्या वनडे सामन्यातून वगळण्यात आले आहे. सुत्रांकडून या संदर्भातील माहिती मिळाली असून कॉफी विथ करण या कार्यक्रमातील बेताल वक्तव्ये या दोघांनाही भोवली आहेत. बीसीसीआयने या प्रकरणी कडक भूमिका घेण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते.

पांड्याने या शोमध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यानंतर सोशल मीडियावरुन त्यांच्यावर टीका झाली होती. या प्रकरणाची बीसीसीआयचे न्यायालय नियुक्त प्रशासकिय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी गंभीर दखल घेतली होती. याप्रकरणी दोघांवरही दोन सामन्यांची बंदी घालण्याविषयी विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर या दोघांनीही उद्या होण्याऱ्या पहिल्या समान्यातून वगण्यात आल्याची माहिती मिळत आहे.   

पांड्याने कॉफी विथ करण या शो मध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह विधाने केली होती. तर राहुलने सचिनपेक्षा विराट अव्वल फलंदाज असल्याचे वक्तव्य केल्याने चाहत्यांनी दोघांचाही खरपूस समाचार घेतला होता. या वक्तव्यांनंतर बीसीसीआयने या दोघांना नोटीस पाठवत खुलासा मागवला होता. यानंतर ट्विटरवरुन पांड्याने आपल्या वक्तव्यावर जाहीर माफी मागितली होती. पण, बीसीसीआयने हे प्रकरण माफीवर मिटणार नसण्याचे संकेत दिले होते. त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई झाल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.   

बीसीसीआयने या प्रकरणी कडक भूमिका घेण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते. त्यानंतर प्रशासकिय समितीने पांड्या आणि केएल राहुल यांना या प्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत बीसीसीआयच्या कोणत्याही सामन्यासाठी सराव करण्यापासून रोखले आहे.