Tue, Jun 25, 2019 15:16होमपेज › Sports › 'बायको आणि मुलगी सोबत असल्‍यास पांड्‍यासोबत अजिबात जाणार नाही'

'बायको आणि मुलगी सोबत असल्‍यास पांड्‍यासोबत अजिबात जाणार नाही'

Published On: Jan 12 2019 12:33PM | Last Updated: Jan 12 2019 12:45PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमातील बेताल वक्‍तव्ये भोवली आहेत. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले आहे. त्यानंतर सोशल मीडियावरूनही त्यांच्यावर टीकेचे झोड उठली असतानाच यावर फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने देखील पांड्या आणि राहूल यांच्‍या वक्तव्‍याचा खरपूस समाचार घेतला.

वाचा : पांड्याला करणच्या कॉफीचे 'चटके'; कंपन्यांनी करार नाकारले!

एका टीव्‍ही कार्यक्रमावेळी फिरकी गोलंदाज हरभजनने विशेष करुन पंड्‍याच्‍या बेताल वक्‍तव्‍याचा कडक शब्‍दात समाचार घेतला. यावेळी हरभजन म्‍हणाला, 'कधी संघाच्‍या बसमध्‍ये पत्‍नी आणि मुलीला घेऊन जायचे असल्‍यास त्‍यावेळी पांड्‍या आणि राहुल बसमध्‍ये उपस्‍थिती असतील तर मी त्‍या बसमधून प्रवास करणार नाही. तुम्‍ही महिलांना फक्‍त एका नजरेतून पाहता आणि ते योग्‍य नाही. आम्‍ही अशा गोष्‍टी मित्रांसमोर देखील बोलत नाहीत. मात्र राहूल आणि पांड्‍याने टीव्हीवर बेताल वक्‍तव्‍य केली. 

वाचा : पांड्या आणि राहुलच्या वक्तव्यांवर काय म्हणाला विराट?

वाचा : हार्दिक पांड्या, राहुलला मालिकेतूनच वगळले