होमपेज › Sports › 'बायकोला वाईट काळच जास्त पाहावा लागला'

'बायकोला वाईट काळच जास्त पाहावा लागला'

Published On: Dec 07 2018 5:09PM | Last Updated: Dec 07 2018 8:41PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने आपल्या ट्विटर तसेच फेसबुक पेजवरून भावनिक व्हिडीओ शेअर करत मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. या व्हिडीओनंतर आता गंभीरने आपल्या पत्नीसाठी असाच एक भावनिक व्हिडीओ ट्विट केला. पत्नी नताशाला उमेदीचा काळ पाहण्याऐवजी वाईट काळ पाहावा लागला असल्याचे मत त्याने व्यक्त केले. आता जास्तीत जास्त काळ मी तुझ्या सोबत असेन असेही त्याने म्हटले आहे.

गंभीरने केलेल्या ट्विटमध्ये 'मी तिची कमजोरी आणि ती मात्र माझी ताकद आहे’ असे नमूद करत ट्विट पत्नी नताशाला टॅग करून आभार मानले. या व्हिडिओमध्ये आपल्या पत्नीबद्दल बोलताना गंभीर म्हणतो, की ‘नताशाला विशेष धन्यवाद. माझ्या स्विंग मूडचा सर्वधिक परिणाम सोसावा लागणारी व्यक्ती म्हणजे नताशा आहे. दुर्देवाने तिला माझ्याबरोबर चांगला आणि उमेदीचा काळ पाहण्याऐवजी वाईट आणि निराशेचा काळ पाहावा लागला. माझी ताकद म्हणून कायम माझ्यापाठीशी उभं राहण्यासाठी धन्यवाद.’ असे मत त्याने व्यक्त केले. 

निवृत्तीनंतर पत्नी आणि मुलीबरोबर अधिक वेळ घालवणार असल्याचेही तो म्हणाला. ‘आता तू मला अधिक वेळ (घरी) पाहू शकतेस. आपल्याला अधिक काळ एकत्र राहता येईल. आणि अनेकदा म्हटलं जातं तसं निवृत्त नवरा म्हणजे एखाद्या गृहिणीसारखाच असतो. त्यामुळेच या नवीन बदलासाठी आता तयार रहा नताशा.’ असेही गंभीर शेवटी म्हणाला.  

I am her weakness but she is my strength. 🙈😘
Thanks @natashagambhir2. #Unbeaten @BCCI pic.twitter.com/Uj20qfvDqP

— Gautam Gambhir (@GautamGambhir) 6 December 2018