Tue, Aug 20, 2019 15:46होमपेज › Sports › मुंबई इंडियन्स खेळाडूंना अनोखी शिक्षा !

मुंबई इंडियन्स खेळाडूंना अनोखी शिक्षा !

Published On: Apr 20 2019 3:38PM | Last Updated: Apr 20 2019 3:18PM
जयपुर: पुढारी ऑनलाईन

प्ले-ऑफ’साठी संघर्ष करीत असलेल्या यजमान राजस्थान रॉयल्स संघासमोर इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत आज मुंबई इंडियन्सचे तगडे आव्हान आहे. गेल्या शनिवारी राजस्थान रॉयल्स संघाने मुंबई इंडियन्स संघावर चार विकेटस्ने विजय मिळवला. याचाच बदला घेण्यसाठी मुंबईचा संघ मैदानात उतरणार आहे.  पण सामन्यापूर्वी पिंक सिटीत दाखल होताना मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा फनी लूक पाहायला मिळाला. 

या फनी लूकचे कारण अद्याप स्पष्ट झालेल नसले तरी ही शिक्षा आहे असे म्हणावे लागले. कारण मुंबई इंडियन्स संघाच्य अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा फनी लूक शेअर करत Emoji punishment kit अशी कॅप्शन दिली आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माने शिक्षा तर दिली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.