Tue, Oct 24, 2017 16:46होमपेज › Sports › ‘गुगलीचा’ जन्म बिलियर्ड्स टेबलवर

‘गुगलीचा’ जन्म बिलियर्ड्स टेबलवर

Published On: Oct 13 2017 5:00PM | Last Updated: Oct 13 2017 5:00PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

लेग स्पिनरचे सर्वांत घातक शस्त्र समजल्या जाणाऱ्या गुगलीचा जन्म क्रिकेटच्या खेळपट्टीवर झालेला नाही. या चेंडूचा जन्म बिलियर्ड्सच्या टेबलावर झाला आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण, हे सत्य आहे. गुगलीचे जन्मदाते  बर्नार्ड बोसानक्वेट यांनीच गुगलीच्या जन्माची कथा सांगितली होती. 

गुगली या चेंडूचे जन्मदाते म्हणून बोसानक्वेट यांना ओळखले जाते. त्यांनी आपण हा चेंडू सर्वप्रथम बिलीयर्ड्सच्या टेबलवर टाकल्याचे म्हटले होते. बोसानक्वेट यांना  १८९७मध्ये ‘ट्वीस्टी-ट्वोस्टी’ हा खेळ  खेळताना गुगलीचा शोध लागला. या खेळात टेनिस बॉल बिलीयर्ड्स टेबलवर अश्या प्रकारे फिरवून टाकायचा असतो जेणेकरुन समोरच्या खेळाडूला तो पकडता  येणार नाही. 

हा बिलियर्ड्स टेबलवरचा गुगली क्रिकेटच्या खेळपट्टीवर यायला १९वे शतक उजडावे लागले. बोसानक्वेट यांनी पहिला गुगली १९०३-०४ला ऑस्ट्रेलियात टाकला होता.