एशियन चॅम्पियन कतारला भारताने बरोबरीत रोखले

Published On: Sep 12 2019 1:45AM | Last Updated: Sep 11 2019 8:49PM
Responsive image


दोहा : वृत्तसंस्था

फिफा वर्ल्डकप क्वालिफाईंगच्या दुसर्‍या फेरीत भारताच्या फुटबॉल संघाने एशियन चॅम्पियन असलेल्या कतार संघाला 0-0 असे बरोबरीत रोखले. बरोबरीत सुटलेल्या या सामन्यासह भारताने गुणतालिकेत एका अंकाची कमाई केली आहे. 

भारताने ओमानशी पहिला सामना 1-2 असा गमावला होता. 2022 वर्ल्डकपचा यजमान संघ वर्ल्ड रँकिंगमध्ये 62 व्या स्थानावर आहे. भारताचे स्थान 103 आहे. भारताचा पुढील सामना 15 ऑक्टोबर रोजी कोलकात्यातील सॉल्टलेक मैदानावर बांगला देश संघाशी होईल. कतारविरुद्ध पराभव न पत्करणारा या सत्रातील भारत हा पहिलाच संघ ठरला आहे. कतारने ब्राझिल, अर्जेंटिना आणि कोलंबियाविरुद्धही गोल केले आहेत. भारताने मात्र कतारला ही संधी दिली नाही. भारताचा स्टार खेळाडू सुनील छेत्री हा या सामन्यात खेळू शकला नाही; पण निकालामुळे तो कमालीचा आनंदी आहे. याआधीच्या वर्ल्डकप क्वालिफाईंग सामन्यात सप्टेंबर 2007 मध्ये कतारने भारताचा 6-0 असा एकतर्फी पराभव केलेला होता. 
 राष्ट्रवादीचे भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा शरद पवार यांच्या संपर्कात


बलात्काराच्या घटनांविरोधात इंडिया गेटवर तीव्र आंदोलन


हैदराबाद एन्काऊंटरवर मांजरेकर म्हणतात 'ये पब्लिक हैं ये सब जानती हैं'


महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती : उद्धव ठाकरे


जाळ्यांच्या नुकसानीपोटी मच्छिमारांना 25 हजार रुपयांचे अनुदान


संजय राऊतांकडून संकेत; सीएम उद्धव ठाकरे फडणवीस यांचीच 'कॉपी' करणार!


शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार होणार? सीएम उद्धव ठाकरेंकडून विनंती


महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दोन मंत्री समन्वय ठेवणार : उद्धव ठाकरे


मेलबर्नच्या खेळपट्टीने ऑस्ट्रेलियाच्या वाढल्या चिंता


प्रियकराला वाचवण्यासाठी प्रेयसीचा बलात्काराचा बनाव