Wed, May 22, 2019 20:33होमपेज › Sports › FIFA2018 : रशियाचा सौदीला ‘पंच’

FIFA2018 : रशियाचा सौदीला ‘पंच’

Published On: Jun 14 2018 7:35PM | Last Updated: Jun 15 2018 12:45AMमॉस्को : पुढारी ऑनलाईन 

21 व्या फिफा विश्‍वचषक स्पर्धेच्या पहिल्या लढतीत यजमान रशियाने सौदी अरेबियाला 5-0 असे हरवून विजयी सलामी दिली. रशियाकडून युरी गाझिन्स्की याने या विश्‍वचषकातील पहिला गोल नोंदवण्याचा मान मिळवला. त्यानंतर रशियाकडून चेरिशेव याने दोन, तर डिझायुबा, गोलोविन यांनी एकेक गोल केले. 

फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेची उद्घाटनाची लढत मात्र एकतर्फी झाली. या सामन्यात यजमान रशियापुढे सौदी अरेबियाच्या खेळाडूंनी अक्षरश: नांगी टाकली. पूर्वार्धात रशिया 2-0 ने आघाडीवर होता. निर्धारित 90 मिनिटांत रशियाकडे 3-0 अशी आघाडी होती; पण नंतरच्या जादा वेळेत आणखी दोन गोल झाल्याने रशियाने हा सामना तब्बल 5-0 असा जिंकला.

या सामन्यापूर्वी सलग सात सामन्यांत विजय न मिळाल्याने रशियावर मोठा दबाव होता. या विजयाने रशियाने 25 वर्षांपूर्वीचा हिशेब चुकता केला. 1993 साली दोन्ही संघांत झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात सौदी अरेबियाने रशियाला 4-3 असे हरवले होते.

12 वा मिनिट... युरी गाझिन्स्की

रशियन आक्रमक फळीने सातत्याने केलेल्या हल्ल्यांमुळे सौदी अरेबियाची बचावफळी उद्ध्वस्त झाली. याचा फायदा रशियाला मिळाला. 12 व्या मिनिटाला रशियाच्या अ‍ॅलेक्झांडर गोलोविन याने युरी गाझिन्स्की याच्याकडे क्रॉस टाकला. युरीच्या आसपास कोणताही खेळाडू नसल्याने त्याने हा क्रॉस हेडद्वारे गोल जाळ्यात ढकलला. स्पर्धेचा पहिलाच गोल हेडद्वारे नोंदवण्यात आला. 

43 वा मिनिट... चेरिशेव

झॉबीनने गोलपोस्टच्या डाव्या बाजूला असलेल्या चेरिशेवकडे पास दिला. तो पास घेऊन त्याने गोलपोस्टकडे आक्रमण सुरू केले असता, सौदीच्या दोन बचावपटूंनी त्याच्या मार्गात अडथळा निर्माण केला; परंतु शांत आणि संयमी चेरिशेवने मोठ्या कौशल्याने चेंडूचा ताबा आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळवले आणि पुढच्याच क्षणी चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला. 

71 वा मिनिट....डिझायुबाया 

डिझायुबायाने ग्लोविनच्या पासवर सौदीच्या बचावफळीला चकवत रशियाचा चौथा गोल नोंदवला. विशेष म्हणजे, तो केवळ एक मिनिटापूर्वी मैदानात आला होता.

  90+1.... चेरिशेव

रशियाचा विंगर चेरिशेव याने रशियासाठी चौथा आणि स्वत:चा दुसरा गोल नोेंदवला. डिझायुबायाने दिलेल्या पास चेरिशेवने अत्यंत कौशल्याने चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलला.

90+4... गोलोविन

सामन्याच्या अगदी शेवटच्या क्षणी रशियाला फ्री किक बहाल करण्यात आली. रशियाच्या गोलोविन याने सौदीची भिंत भेदून चेंडूला गोलपोस्टमध्ये पाठण्यात कोणतीच चूक केली नाही.
 

लाईव्ह अपडेट : 

*एक्स्ट्रा टाईममध्ये  फ्रि कीकवर रशियाचा पाचवा गोल गोलोविनने केला पाचवा गोल 

*फ्रि कीकवर रशियाचा पाचवा गोल

*एक्सट्रा टाईममच्या पहिल्या मिनिटीला गोल 

*रशियाचा धडाका सुरुच, सौदीवर चौथा गोल 

*रशियाला कार्नर, गोल करण्‌याची संधी हुकली 

*७१ व्या मिनिटाला रशियाकडून आरतेम डॅझुकाने केला तिसरा गोल  

*रशियाची धमाकेदार खेळी, सौदीवर केला तिसरा गोल 

*रशियाचे पुन्हा आक्रमण, पण गोल करण्यात अपयश 

*रशियाचे आक्रमण, गोल रक्षकाने हेड रोखला

*सौदीकडे ६४ टक्के बॉलवर नियंत्रण असूनही गोल करण्यात अपयश 

*सौदीला फ्रि कीक मिळाली, गोल  करण्यात अपयश 

*रशियाकडे २-० ची आघाडी 

*रशियाचा दुसरा गोल. ४१ व्या मिनिटाला केला गोल 

*रशियाची दुसरा गोल करण्याची संधी हुकली

*सौदीला फ्रि कीक, गोल करण्यात अपयश 

*रशियाचे सौदीच्या गोलपास्टवर आक्रमण, गोल करण्यात अपयश 

*रशियाचा खेळाडू जखमी, बदली खेळाडू मैदानात 

*सौदीला कॉर्नर, संधी हुकली

*सौदीचे जोरदात आक्रमण, गोल करण्यात अपयश 

*रशियाचे चेंडूवर चांगले नियंत्रण 

Game feed photo

*मिडफिल्डर युव्ही गॅझेन्सकीने केला गोल 

*सौदी अरेबियावर रशियाचा पहिला गोल, १२ व्या मिनिटाला गोल 

*रशियाचे जोरदार आक्रमण, परंतु गोल करण्यात अपयश 

*सौदीचे रशियाच्या गोलपोस्टवर आक्रमण 

*दोघांचाही बचावावर भर, डिफेन्सला चार खेळाडू 

*रशियाने नाणेफेक जिंकली 

रशियाचे सौदीवर प्रतिआक्रमण, गोल करण्याची संधी हुकली 

*सौदीचे रशियाच्या गोलपोस्टवर आक्रमण 

*दोन्ही राष्ट्रांचे राष्ट्रगीत सुरु 

*रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे भाषण सुरु, रशियन भाषेतून करत आहेत भाषण 

*मैदानावर फुटबॉलची आकर्षक प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. 

*रशियाची एडाच्या गाण्यास सुरुवात

*लुझ्निकी स्टेडियमवर उद्घाटन सोहळ्यास सुरुवात, रॉबी विल्यम्स याच्या गाण्याने झाली सुरुवात 

*विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण