Sun, May 26, 2019 15:41होमपेज › Sports › Fifa 2018 : या शुभंकराने वाघाला टाकले मागे

Fifa 2018 : या शुभंकराने वाघाला टाकले मागे

Published On: Jun 14 2018 4:40PM | Last Updated: Jun 14 2018 5:54PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

फुटबॉलच्या जागतिक महासंग्रामाला आजपासून रशियात सुरुवात होत आहे. या महासंग्रामाकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहीले आहे. दर चार वर्षांनी आयोजित केल्या जाणाऱ्या या महासंग्रामाची ही २१वी स्पर्धा आहे.  आजपासून १५ जुलैपर्यंत हा महासंग्राम होणार आहे. यात एकूण ३२ देशांनी सहभाग घेतला असुन महिन्याभरात ६२ सामने खेळले जाणार आहेत. यंदाच्या स्पर्धेसाठी चष्मा परिधान केलेल्या आयाळ असलेल्या लांडग्याची शुभंकर म्हणून निवड करण्यात आली आहे. 

यंदाच्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या शुभंकराला 'जाबीवाका' असे नाव देण्यात आले आहे. या नावातही अर्थ लपला आहे. जाबीवाका हा रशियन भाषेतील शब्द आहे. या शब्दाचा अर्थ ‘जो जास्त स्कोर करेल तो’ असा आहे. या शुभंकरने सुद्धा सर्वाधिक मते मिळवून वाघाला मागे टाकत हा यंदाच्या शुभंकरचा मान पटकावला आहे. 

Image result for fifa world cup 2018 mascots

शुभंकरची निवड 

शुभंकरची निवड प्रक्रिया अनेक महिने सुरू होती. त्यासाठी फुटबॉल चाहत्यांची आनलाईन मते मागवण्यात आली होती. यामध्ये चाहत्यांनी मांजर आणि वाघाला निवडण्याऐवजी सर्वात जास्त पसंती कोल्ह्याला दिली. त्यानुसार शुभंकर म्हणून लांडग्याची निवड करण्यात आली. या शुभंकराची घोषणा शनिवारी सकाळी करण्यात येणार आहे. 

Image result for fifa mascot wolf  and tiger

शुभंकर म्हणजे काय

नशिबवान किंवा शुभ मानल्या जाणाऱ्या प्राण्यांना, वस्तुंना किंवा व्यक्तींना शुभंकर असे म्हटले जाते. अनेकदा संस्था, संघटना आपली ओळख निर्माण करण्यासाठी शुभचिन्ह निवडतात. त्यात काहीतरी वेगळेपण आणि संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. खेळांमध्येही स्पर्धेदरम्यान अशा चिन्हांचा वापर  शुभंकर म्हणून केला जातो.

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने शुभांकरसंदर्भात अशी माहिती सांगितली आहे की, या शुभंकर निवडीसाठी जवळपास १० लाखाहुन अधिक लोकांचे मतदान घेण्यात आले आहे. फुटबॉलच्या इतिहासाच प्रथमच शुभंकर निवडण्यासाठी इतक्या लोकांचे मतदान घेतले आहे.

Image result for fifa world cup 2018 mascots

महासंघाने म्हटले आहे की, आमच्या नव्या मित्राला हॅलो म्हणायचे आहे. यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेंचे आयोजन रशियामध्ये केले आहे. यामध्ये मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग आणि सोच्चि सहित यांच्यासोबत 11 शहरांमध्ये आयोजन करण्यात येणार आहे.