Thu, May 28, 2020 17:43



होमपेज › Sports › ‘लाभाचे पद’ नियमासंदर्भात वास्तववादी द़ृष्टिकोनाची गरज : सौरव गांगुली

‘लाभाचे पद’ नियमासंदर्भात वास्तववादी द़ृष्टिकोनाची गरज : सौरव गांगुली

Published On: Aug 23 2019 8:49PM | Last Updated: Aug 23 2019 8:49PM




मुंबई : क्रीडा प्रतिनिधी

‘लाभाचे पद’ या नियमासंदर्भात वास्तववादी द़ृष्टिकोनाची गरज असल्याचे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांने व्यक्त केले आणि रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट व आयपीएलमधील भूमिकेचे उदाहरणदेखील गांगुलीने दिले. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड व व्हीव्हीएस लक्ष्मण यांसह गांगुलीलादेखील ‘लाभाचे पद’ मुद्द्यावर नोटीस देण्यात आली होती.

क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (कॅब) याचे अध्यक्ष व आयपीएल फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सचा मेंटर अशी दुहेरी भूमिका बजावत असल्याने गांगुलीला नोटीस मिळाली. या महिन्याच्या सुरुवातीला द्रविडला बीसीसीआयचे एथिक ऑफिसर असलेल्या जस्टिस (निवृत्त) डी. के. जैन यांनी ‘लाभाचे पद’ मुद्द्यावर नोटीस पाठवली होती. नियमातून कोणाला वगळावे असे मी म्हणत नाही; पण नियम हे वास्तवाला अनुसरून असावे. राहुल द्रविड यांना एनसीएचा प्रमुख बनविण्यात आले व त्यांचा इंडिया सिमेंटस् सोबतच्या नोकरीबाबत समस्या निर्माण झाली; पण यावर वास्तववादी पद्धतीने विचार केला जावा.

एखादा खेळाडू समालोचन किंवा प्रशिक्षण देत असेल तर मला त्यामध्ये ‘लाभाचे पद’ मुद्दा दिसत नाही. जेव्हा तुम्ही जागतिक स्तरावर विचार करता तेव्हा रिकी पाँटिंगकडे बघा त्याने ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षकपद भूषवले तरीही तो अ‍ॅशेस मालिकेत समालोचन करीत आहे. तो पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात दिल्ली कॅपिटल्ससोबत येईल. हे ‘लाभाच्या पदा’अंतर्गत येत नाही. हे त्या खेळाच्या कौशल्यावर अवलंबून असते, असे गांगुलीने सांगितले.