Sat, Dec 15, 2018 15:37होमपेज › Sports › अर्जुन तेंडूलकर लॉर्ड्सवर पण, मैदान वाळवण्यासाठी 

अर्जुन तेंडुलकर लॉर्ड्सवर पण, मैदान वाळवण्यासाठी 

Published On: Aug 10 2018 9:05PM | Last Updated: Aug 10 2018 9:21PMलंडन : पुढारी ऑनलाईन 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकरने नुकतेच भारताच्या १९ वर्षाखालील संघात पदार्पण केले आहे. सध्या अर्जुन तेंडुलकर इंग्लंडमध्ये सराव करत आहे. भारताचा दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर कालपासून सुरु झाला. या सामन्यास सचिन तेंडुलकरही उपस्थित होता. 

सचिनचा मुलगा अर्जुनही भारतीय फलंदाजांना सरावावेळी गोलंदाजी करण्यासाठी लॉर्ड्सवर आला आहे. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावासाने व्यत्यय आणला; त्यामुळे खेळ थांबला होता. काही वेळाने पाऊस थांबल्यावर मैदानावरील पाणी काढण्यासाठी ग्राऊंड स्टाफ पळापळ करत असतानाच अर्जुन तेंडुलकरही मैदानावर आला आणि त्याने ग्राऊंड स्टाफला आपला मदतीचा हात दिला. जगातील महान फलंदाजाच्या मुलाने ग्राऊंड स्टाफला मदत केल्याने त्याची सर्व स्थरातून प्रशंसा होत आहे.