Fri, Jul 03, 2020 23:12होमपेज › Sports › 'जा रे जा रे पावसा'...केदारची वरूणराजाला साद(Video)

'जा रे जा रे पावसा'...केदारची वरूणराजाला साद(Video)

Published On: Jun 13 2019 8:43AM | Last Updated: Jun 13 2019 9:05AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

संपूर्ण देशभरात सध्या क्रिकेट विश्वचषकाचा फिव्हर चढलेला आहे. भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये बाजी मारत स्पर्धेची धडाकेबाज सुरुवात केली आहे. या विजयाच्या अर्विभावात न जाता मराठमोळ्या केदार जाधवने वरूणजाला आपल्या महाराष्ट्राकडे जा अशी भावनिक साद घातली आहे. सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल होत आहेच पण याबरोबर 'शेवटी मराठी माणसाच दुःख हे मराठी माणूसच समजू शकतो अशा कॅप्शन देत त्याचे आभार देखील चाहते सोशल मीडियातून मानत आहेत. 

इंग्लंडमध्ये सध्या पावसाचं वातावरण आहे. बहुतांश सामन्यांवर पावसाचं सावट आहे, सर्वांचं लक्ष लागून असलेल्या भारत विरुद्ध पाक सामन्यातही पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. केदार जाधवने न्यूझीलंडविरुद्ध सामन्याआधी, नॉटिंगहॅम शहरात आकाशात गर्दी केलेल्या ढगांकडे पाहून, वरुणराजाला एक सुंदर प्रार्थना केली आहे. माझ्या महाराष्ट्रात तुझी जास्त गरज आहे, असं म्हणत केदारने जा रे जा रे पावसा, अशी वरुणराजाला भावनिक साद घातली. 

राज्यातल्या जनतेला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत असताना इंग्लंडमध्ये मात्र पावसामुळे सामने रद्द होत आहे. त्यामुळेच केदारने वरुण राजाला भावनिक आव्हान केलं आहे. केदारच्या या व्हिडीओने देशातील क्रिकेट प्रेमीसोबतच इतरांची मनेही जिंकली आहेत.