होमपेज › Sports › झिम्बाब्वेचे यश क्रिकेटसाठी फायद्याचे 

झिम्बाब्वेचे यश क्रिकेटसाठी फायद्याचे 

Published On: Jul 18 2017 1:51AM | Last Updated: Jul 18 2017 12:33AM

बुकमार्क करा


मुंबई : क्रीडा प्रतिनिधी 

श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेत  झिम्बाब्वेने मिळवलेला विजय हा क्रिकेटसाठी  चांगला असल्याचे मत भारताचा आघाडीचा ऑफस्पिनर आर. अश्‍विनने व्यक्‍त केले आहे. पाच लढतींच्या मालिकेत झिम्बाब्वेने 3-2 असा विजय साजरा केला होता. 

क्रिकेट हा अतिशय अनिश्‍चिततेचा खेळ आहे. कोणी कधीही जिंकते व कधीही हारते. कदाचित उद्या अफगाणिस्तान कोणत्या तरी संघाला नमवेल. अशा पद्धतीनेच खेळ पुढे जाईल व खेळासाठी अशी स्पर्धा महत्त्वाची आहे, असे अश्‍विन मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये पत्रकारांना म्हणाला.  

श्रीलंकेविरुद्ध मालिकेत अश्‍विन निर्णायक भूमिका बजावू शकतो. त्याबाबत तो म्हणाला, ‘लंकेचा संघ सध्या अडचणीत दिसत असला तरी त्यांना कमी लेखून चालणार नाही. कारण, त्यांच्यात मुसंडी मारण्याची क्षमता आहे. कसोटीत 300 विकेटचा टप्पा गाठण्यापासून अश्‍विन फक्‍त 25 विकेट दूर असून लंकेविरुद्ध मालिकेत तो हा माईलस्टोन गाठेल, अशी अपेक्षा आहे.