टीम इंडियाचा आफ्रिका दौरा होणार की नाही?

Last Updated: May 23 2020 5:37PM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

दक्षिण आफ्रिकेला ऑगस्टमध्ये होणाऱ्या दौऱ्याबाबत आम्ही कोणतेच आश्वासन दिले नाही, फक्त दौऱ्याच्या शक्यतेबाबत चर्चा झाली आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खजिनदार अरुण धुमल यांनी म्हटले आहे. क्रिकेट साऊथ आफ्रिकेचे संचालक ग्रॅमी स्मिथ आणि कार्यवाहक मुख्य कार्यकारी जॉक फॉल यांनी सांगितले होते की, तीन सामन्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी होकार दिला आहे. 

कोरोना व्हायरस संक्रमणामुळे दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा रद्द झाला तेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करण्याचा प्रयत्न करू असे म्हटले होते. आम्ही ऑगस्टच्या दौऱ्याबाबत कोणतेच आश्वासन दिले नाही, असे धुमल म्हणाले. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, जोवर सरकार आंतरराष्ट्रीय प्रवासाला मंजुरी देत नाही तोवर बीसीसीआय कोणत्याही देशाला कोणतेच आश्वासन देऊ शकत नाही.

जुलैमध्ये श्रीलंका आणि नंतर झिम्बाब्वे (टी 20 मालिका) येथे संघाला पाठवायचे की नाही हे आम्ही आताच सांगू शकत नाही. हे दोन्ही दौरे आमच्या भविष्य कार्यक्रमाचा भाग आहेत. दोन महिन्यानंतर काय स्थिती असेल हे आम्हाला माहित नाही. असे धुमल म्हणाले. आयसीसी अध्यक्षपदाबाबत बोलताना धुमल यांनी सांगितले की, आयसीसी अध्यक्षपदाबाबत बीसीसीआयमध्ये कोणतीच औपचारिक चर्चा झालेली नाही. स्मिथने आपले वैयक्तिक मत मांडले आहे. बीसीसीआयबाबत बोलायचे झाल्यास आमच्या अध्यक्षाकडे याची क्षमता आहे. पण, आम्ही याबाबत चर्चा केली नाही.

बोर्ड राष्ट्रीय शिबिरासाठी सुरक्षित स्थानाच्या पर्यायाचा विचार करत आहोत. जर, बंगळुरू स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये हे शिबीर आयोजित झाले नाही. तर, धर्मशाला चांगला पर्याय असू शकतो. असे धुमल म्हणाले. धर्मशाला येथे इनडोअर स्टेडियमची सुविधा देखील आहे.

ठाणे : 'फक्त साथ द्या, कोरोना आटोक्यात येईल'


यशोमती ठाकूर पोहोचल्या थेट कोविड वॉर्डात!


अशी झाली नर्गिस-सुनील दत्तच्या लव्हस्टोरीची सुरूवात


शिराळा : ८१ वर्षाच्या वृद्धाला कोरोना; मणदूर गावात शुकशुकाट


'तो' कोरोना रुग्ण गेला कुणीकडे? केईएम प्रशासनाचा निष्काळजीपणा सुरुच!


'कोरोना अदृष्य पण, त्याचा सामना अपराजित कोरोना वॉरियर्सशी'


तुम्ही एकटे नाही! अमेरिकेतील आंदोलनाला गुगलचा खंबीर पाठिंबा


नागपूरातील कोरोना कंट्रोलचा मुंडे पॅटर्न; अर्ली ट्रेसिंग, मास क्वारंटाईन, टीम मॅनेजमेंट


तब्बल ८ पावसाळी नक्षत्रांची सुरुवात रविवारीच! 


संगीतकार वाजिद यांच्याबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?