स्ट्रोक्स करतोय आयपीएल खेळण्याची तयारी

Last Updated: Mar 26 2020 9:17PM
Responsive image
बेन स्ट्रोक्स


नवी दिल्ली : वृत्तसंस्था

‘आयपीएल होईल की नाही हे माहीत नसले तरी मी या स्पर्धेत खेळण्यासाठी फिट राहण्याचा प्रयत्न करीत आहे,’ असे मत इंग्लंड आणि राजस्थान रॉयल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्ट्रोक्स याने व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे संपूर्ण देशभरात 21 दिवसांकरिता पूर्णपणे संचारबंदी करण्यात आल्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) रद्द करण्यासाठी प्रचंड दबाव येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आयपीएल रद्द होण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, असे असताना  आयपीएल खेळण्यासाठी आपण तयार असल्याचे स्ट्रोक्स म्हणाला.

स्ट्रोक्स म्हणाला की, ‘आताच्या क्षणाला मी इतकेच सांगू शकतो की आता मी नजीकजी स्पर्धा खेळेन ती आयपीएल स्पर्धा असेल. आयपीएल होईल की नाही हे मी आताच सांगू शकत नसलो तरी मला खेळण्यासाठी मानसिकद़ृष्ट्या तयार राहावे लागणार आहे. मला आतापासूनच तयारीला लागायला हवे आणि स्पर्धेत खेळण्याच्या द़ृष्टीने स्वत:ला शारीरिकद़ृष्ट्या तंदुरुस्त ठेवायला हवे. मी तीन आठवडे आराम करून अचानक 20 एप्रिलला मैदानात खेळण्यासाठी उतरू शकत नाही. तसे कोणालाच जमणार नाही. कदाचित, आयपीएल खेळली जाईल आणि तसे झाले तर मला मागे राहायचे नाही. आम्हाला अनेक प्रकारचे सल्ले देण्यात आले आहेत. त्यामुळे जर आयपीएलचे आयोजन करण्यात आले, तर मी नक्कीच योग्य तो निर्णय घेईन.’