Wed, Apr 01, 2020 22:50होमपेज › Sports › ट्विटरवर टिवटिवाट; विराट तुझ्यापेक्षा स्मिथच भारी!

ट्विटरवर टिवटिवाट; विराट तुझ्यापेक्षा स्मिथच भारी!

Last Updated: Feb 24 2020 1:29AM
वेलिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 165 धावात आटोपला. भारताकडून उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 47 धावा केल्या. तर कर्णधार विराट कोहलीला फक्त 2 धावा करण्यात यश आले. विराट पुन्हा एकदा बाहेरचा चेंडू मारण्याच्या नादात बाद झाला. विराट बाद झाल्यानंतर नाराज झालेल्या नेटकऱ्यांनी ट्विटरवर जागतिक क्रिकेटमध्ये किंग कोण विराट की स्मिथ या चर्चेला उधाण आणले. 

NZvsIND : इशांतने जमलेली जोडी फोडली, टेलर बाद

विराट कोहलीला जवळपास 19 डावात शतक ठोकता आलेले नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात तो फक्त 2 धावा करुन बाद झाला. तो बाद झाल्यानंतर ट्विटवर नेटकऱ्यांनी कसोटीत विराटपेक्षा ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथत सरस असल्याचेही सांगितले. विशष म्हणजे न्यूझीलंड दौऱ्यात विराटला पाचव्यांदा 20 धावाही करता आलेल्या नाहीत. विराटने आपले शेवटचे कसोटी शतक (136) बांगलादेश विरुद्धच्या दिवस रात्र कसोटी सामन्यात ठोकले होते. त्यामुळे नेटकऱ्यांनी विराट कोहली हा फक्त पाटा खेळपट्टीवरचा बादशाह आहे. आव्हानात्मक खेळपट्टीवर स्मिथच धावा करु शकतो असा सूर आवळला.

विशेष म्हणजे विराटच्या शतकांचा दुष्काळ पहिल्यांदाच आलेला नाही. 2011 मध्येही त्याला 24 डावात एकही शतक आले नव्हते. 2014 मध्येही त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये 25 डाव शतक ठोकण्यात अपयश आले होते. पण, एकंदर शतकांच्या शर्यतीत विराट आणि स्मिथमध्ये बरेच अंतर आहे. विराटने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये 70 शतके ठोकली आहेत. तर स्मिथची 35 शतके झाली आहेत. विराटची स्मिथच्या तुलनेत दुप्पट शतके आहेत. 

असे असले तरी कसोटीचा विचार केला तर स्मिथ विराटच्या फार दूर नाही विराटची कसोटीत 27 शतके तर स्मिथची 26 शतके झाली आहेत.