Tue, Oct 24, 2017 16:58
29°C
  Breaking News  

होमपेज › Sports › श्रीलंकेला फॉलोऑन; दुसऱ्या डावात १ बाद १९ धावा

श्रीलंकेला फॉलोऑन; दुसऱ्या डावात १ बाद १९ धावा

Published On: Aug 13 2017 10:56AM | Last Updated: Aug 13 2017 4:44PM

बुकमार्क करा

कॅन्डी (श्रीलंका) : वृत्तसंस्था

भारताचा नवोदीत फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या फिरकीसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याने, भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड घेतली आहे. भारताच्या ४८७ धावसंख्येपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांची पडझड झाली. भारतीय गोलंदाजांनी त्यांचा डाव १३५ धावांत गुंडाळला. यात कुलदीपने सर्वाधिक चार बळी घेतले. त्याला अश्विन आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन बळी घेत चांगली साथ दिली.

पहिल्या डावात ३५२ धावांची आघाडी मिळालेल्या भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिला. त्यानंतरही श्रीलंकेच्या फलंदाजांची हाराकीरी सुरूच असून, दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने थरंगाच्या बदल्या (३१ चेंडूत ७ धावा) १९ अशी सुरुवात केली होती. भारताने मजबूत पकड मिळविलेल्या समान्याचा सामन्याचा उद्या तिसरा दिवस असून, भारतीय गोलंदाजांची दौऱ्यातील कामगिरी पाहता, समाना उद्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या सत्रातच संपण्याची शक्यता दिसत आहे. 

तत्पुर्वी, हार्दिक पांड्याच्या तडाखेबाज खेळीनतंर भारताचा पहिला डाव ४८७ धावांत संपुष्टात आला. उमेश यादव ३ धावांवर नाबाद राहिला. संदाकनच्या गोलंदाजीवर पंड्या मोठा फटका मारण्याच्या नादात परेराकडे झेल देऊन बाद झाला. 

पांड्याने टी-२० स्टाईलने धुलाई करत ८६ चेडूंत शानदात शतक झळकावले. त्याच्या या शतकी खेळीत ८ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. पुष्पकुमाराच्या एका षटकात पांड्याने २६ धावा अक्षरशः कुटल्या. पहिल्या दोन चेडूंत त्याने २ चौकार ठोकले. त्यानतंरच्या ३ चेडूंत सलग तीन शानदार षटकार लगावले. तळातील फलंदाजांना हाताशी घेत त्याने धावफलक हलता ठेवला. आठव्या विकेटसाठी पांड्या आणि कुलदीप यादवने ६२ धावांची भागिदारी केली. कुलदीप यादव २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर मोहम्मद शमी ८ धावा काढून माघारी परतला. 

दुसऱ्या दिवशी भारताची खराब सुरूवात झाली. कालच्या ३२९ धांवावरून आजच्या खेळाची सुरूवात झाली. मात्र, कालच्या धावसंख्य़ेत १० धावांची भर पडते न पडते तोच यष्टीरक्षक वृध्दीमान साहा (१६) बाद झाला. फर्नांडोच्या गोलंदाजीवर परेराने त्याचा झेल पकडला. 

तत्पुर्वी, काल आघाडीचे फलंदाज शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १८८ धावांची भागीदारी केली. परंतु, ते तंबूत परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली (४२), चेतेश्‍वर पुजारा (८) आणि अजिंक्य रहाणे (१७) लवकर बाद झाले. त्यामुळे धास्तावलेल्या श्रीलंकन गोलंदाजांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या ६ बाद ३२९ धावा झाल्या. आर. अश्‍विन तंबूत परतणारा अखेरचा फलंदाज ठरला. त्याला (३१) धावांवर फर्नांडोने डिकवेलाकरवी झेलबाद केले.

आघाडीवीर शिखर धवनने जबरदस्त फलंदाजी करत कसोटी कारकीर्दीतील सहावे शतक फटकावले. तर दुसर्‍या बाजूला के. एल. राहुलने सलग सातवे अर्धशतक नोंदवत नवा विक्रम आपल्या नावावर केला. मात्र, तो शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. तो ८५ धावांवर पुष्पकुमाराच्या गोलंदाजीवर करुणारत्नेच्या हाती झेल देऊन बाद झाला. धवनने (११९) आणि राहुलने (८५) धावा केल्या.  पुष्पकुमाराने तीन तर संदाकनने दोन बळी घेतले. 

सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये श्रीलंकेला धूळ चारणार्‍या ‘टीम इंडिया’कडे तिसराही कसोटी सामना जिंकत इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या ‘टीम इंडिया’ ला श्रीलंकेविरुद्ध तिसर्‍या आणि शेवटच्या कसोटीत विजय मिळवून परदेशात तीन सामन्यांच्या मालिकेत ‘व्हाईट वॉश’ करण्याची चांगली संधी चालून आली आहे. विराटच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’ ने श्रीलंकेविरुद्ध 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले २ सामने खिशात घातलेे आहेत. जर तिसर्‍या व अंतिम कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयाची पुनरावृत्ती करण्यात यशस्वी ठरला, तर परदेशात ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ‘क्लीन स्वीप’ देणारा हा पहिला भारतीय संघ ठरेल.

भारताने परदेशात आतापर्यंत केवळ बांगलादेश व झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध ‘क्लीन स्वीप’ची कामगिरी केली आहे. परंतु, त्या मालिकांमध्ये केवळ एक किंवा दोन मर्यादित सामने होते. भारताने २००० मध्ये बांगलादेशाचा एका कसोटी सामन्याच्या मालिकेत १-०, तर २००४ व २०१० मध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने पराभव केला होता.

भारताने ऑस्ट्रेलियाचा चार सामन्यांच्या मालिकेत ४-० ने पराभव केला  होता. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’ने १९९३-९४ मध्ये इंग्लंड व श्रीलंकाविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ‘क्लीन स्वीप’ची नोंद केली आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध याची पुनरावृत्ती केली होती.