होमपेज › Sports › सॅम कुरेनमुळे मालिका हरलो : शास्त्री 

सॅम कुरेनमुळे मालिका हरलो : शास्त्री 

Published On: Sep 14 2018 8:19PM | Last Updated: Sep 14 2018 8:23PMदुबई : पुढारी ऑनलाईन 

भारताने इंग्लंडमधील कसोटी मालिका ४-१ अशा फरकाने गमावली. या मालिकेत भारताच्या फलंदाजांनी कच खाल्ली होती. पण, संघाचे प्रशिक्षक शास्त्री यांनी पराभवाला सॅम कुरेनला जबाबदार धरले. सहसा एखाद्या संघाच्या पराभवाला त्या संघातील खेळाडूंची खराब कामगिरी जबाबदार असते. पण, शास्त्रींनी पराभवाला प्रतिस्पर्धी संघातील चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला जबाबदार धरले आहे. 

चौथी कसोटी होण्यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये खेळणारा संघ आतापर्यंत इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघात सरस आहे असे वक्तव्य केले होते. याच्यावरुन सुनिल गावस्कर यांनी त्यांचे कान उपटले होते. आता शास्त्रींनी भारताला इंग्लंडच्या संपूर्ण संघाने जेवढे आव्हान दिले नाही. त्यापेक्षा जास्त सॅम कुरनेने दिले असे वक्तव्य केले आहे. 

त्यांनी भारत अजूनही कसोटीत क्रमवारीत अव्वल आहे. इंग्लंडच्या संघाला  आणि तेथील माध्यमांना माहित आहे की  आम्ही त्यांना कशा प्रकारे टक्कर दिली आहे. लोक काय म्हणत आहेत याचा आम्ही विचार करत नाही.