होमपेज › Sports › #DhoniRetires ट्विटरवर ट्रेंड अन् साक्षी धोनीचे 'ते' ट्विट डिलीट!

#DhoniRetires ट्विटरवर ट्रेंड अन् साक्षी धोनीचे 'ते' ट्विट डिलीट!

Last Updated: May 28 2020 10:23AM
रांची: पुढारी ऑनलाईन

सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड येईला सांगता येत नाही. अचानक काल (दि.२८) ट्विटरवर #DhoniRetires ट्रेंड सुरू झाला. या ट्रेंडमळे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी निवृत्त होणार या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले. या ट्रेंडनंतर सोशल मीडियावर मीम्स तर काहींचे भावूक मेसेज येण्यास सुरूवात झाली. दरम्यान, हा ट्रेंड सुरू करणाऱ्यांना धोनीची पत्नी साक्षी धोनीने ट्विट करत प्रत्युत्तर दिले मात्र, कालांतराने तिने ते डिलीट केले. त्यामुळे क्रिकेट जगतात धोनीच्या निवृत्तीवरून अनेक तर्कवितर्क काढण्यास सुरूवात झाली.

वाचा: गब्बरने सांगितला निवृत्तीनंतरचा प्लॅन!

बुधवारी अचानक ट्विटरवर #DhoniRetires ट्रेंड सुरू झाला. त्यांनतर या ट्रेंड अनुसरून त्याच्या चाहत्यांनी भावूक मेसेजेस पोस्ट करण्यास सुरू केली. तर कोणी धोनीची आभार मानू लागले. हे सर्व पाहता पत्नी साक्षी धोनीने ट्रेंड व्हायरल करणाऱ्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले. 

''या सर्व अफवा आहेत. असे वाटत आहे की लॉकडाऊनने लोकांची मानसिकता अस्थिर केली आहे, असे साक्षीने ट्विटमध्ये म्हटले आहे. मात्र काही कालांतराने साक्षीने हे ट्विट वॉलवरून डिलीट केले . त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला नवे वळण लागले आहे.

वाचा: एकच चर्चा शिगेला; टी-२० वर्ल्डकप होणार की नाही?

गेल्यावर्षी जूनमध्ये पार पडलेल्या विश्वचषकानंतर धेानी मैदानात उतरलेला नाही. यासोबतच तो अनेक मालिकांमधील संघात राहिला नाही आणि बीसीसीआयनेही त्याला केंद्रीय करारातील खेळाडूंच्या यादीतून वगळले आहे. दरम्यान, आयपीएल 2020 स्पर्धेनिमित्त मैदानात उतरणार होता. त्यासाठी त्याने सरावदेखील सुरू केला होता. मात्र, कोरोनामुळे अनिश्चित कालावधीसाठी आयपीएलचे सामने पुढे ढकलण्यात आले आहेत.